मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दानीएल ८:२५सुमारे इ.स.पू. ५५३

    तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.

  2. दानीएल ८:२६सुमारे इ.स.पू. ५५३

    “संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्‍या भविष्यकाळाशी संबंधित आहे.”

  3. दानीएल ८:२७सुमारे इ.स.पू. ५५३

    मग मी दानीएल, बेशुद्ध झालो आणि पुढेही कित्येक दिवस आजारी होतो. पुढे मी उभा झालो आणि राजाचा कारभार पाहू लागलो. परंतु या दृष्टान्तामुळे मी विस्मित झालो, माझे अंतःकरण फार अस्वस्थ झाले; ते समजण्यापलीकडे होते.

  4. दानीएल ९:१सुमारे इ.स.पू. ५३८

    अहश्वेरोशचा पुत्र दारयावेशच्या कारकिर्दीचे ते पहिलेच वर्ष होते. दारयावेश हा मेदिया वंशातील होता, तो खाल्डियन राज्यावर राजा करण्यात आला होता;

  5. दानीएल ९:२सुमारे इ.स.पू. ५३८

    त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.

  6. दानीएल ९:३सुमारे इ.स.पू. ५३८

    तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.

  7. दानीएल ९:४सुमारे इ.स.पू. ५३८

    याहवेह माझ्या परमेश्वराला मी प्रार्थना केली आणि पापे कबूल केली: “हे याहवेह, महान व प्रतापी परमेश्वरा, तुमच्यावर प्रीती करणार्‍यांना आणि तुमच्या आज्ञा पाळणार्‍यांकरिता तुम्ही केलेला तुमच्या प्रीतीचा करार पाळता,

  8. दानीएल ९:५सुमारे इ.स.पू. ५३८

    परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत.

  9. दानीएल ९:६सुमारे इ.स.पू. ५३८

    आम्ही तुमचे सेवक संदेष्टे जे तुमच्या नावाने आमचे राजे, आमचे राजपुत्र आणि आमचे पूर्वज आणि देशातील सर्व लोकांना तुमच्या नावाने संदेश देत असत, त्यांचे आम्ही ऐकले नाही.

  10. दानीएल ९:७सुमारे इ.स.पू. ५३८

    “हे प्रभू, तुम्ही नीतिमान आहात, परंतु आज आम्ही लज्जित झालो आहोत; यहूदीयात राहणारे, यरुशलेमात राहणारे, जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएली लोक आणि ज्यांना तुमच्याविरुद्ध केलेल्या अविश्वासाच्या कृत्यांमुळे सर्व देशांमध्ये तुम्ही घालवून दिले.

  11. दानीएल ९:८सुमारे इ.स.पू. ५३८

    हे याहवेह, आम्ही, आमचे राजे, आमचे राजपुत्र, आणि आमचे पूर्वज फार लज्जित आहोत, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  12. दानीएल ९:९सुमारे इ.स.पू. ५३८

    जरी आम्ही त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली, तरीही याहवेह आमचे परमेश्वर दयाळू आणि क्षमा करणारे आहेत;

  13. दानीएल ९:१०सुमारे इ.स.पू. ५३८

    आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही आणि त्यांनी आपल्या सेवक संदेष्ट्यांच्या मार्फत दिलेले नियम आम्ही पाळले नाही.

  14. दानीएल ९:११सुमारे इ.स.पू. ५३८

    सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  15. दानीएल ९:१२सुमारे इ.स.पू. ५३८

    आमच्यावर मोठी संकटे आणून तुम्ही आम्हाला आणि आमच्या अधिपतींविरुद्ध दिलेले वचन पूर्ण केले आहे. संपूर्ण स्वर्गाच्या खाली असे काहीही झाले नाही, जसे यरुशलेमसोबत करण्यात आले.

  16. दानीएल ९:१३सुमारे इ.स.पू. ५३८

    मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आमच्याविरुद्ध लिहून ठेवलेली सर्व संकटे आमच्यावर आली आहेत, तरीही आमच्या अपराधांपासून वळून आणि तुमच्या सत्याकडे लक्ष लावण्यास आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराला विनंती केली नाही.

  17. दानीएल ९:१४सुमारे इ.स.पू. ५३८

    म्हणूनच याहवेहने कोणताही संकोच बाळगता आमच्यावर संकटे पाठविली, कारण याहवेह आमचे परमेश्वर जे काही करतात त्यामध्ये ते नीतिमान आहेत; तरीही आम्ही त्यांच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

  18. दानीएल ९:१५सुमारे इ.स.पू. ५३८

    “आणि आता याहवेह आमच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या महान हातांनी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आपल्या नावाची महिमा प्रस्थापित केली, जी आजपर्यंत आहे. आम्ही पाप केले आणि आम्ही चूक केली.

  19. दानीएल ९:१६सुमारे इ.स.पू. ५३८

    हे प्रभू, तुमच्या पूर्ण न्यायकृत्यांप्रमाणे तुमच्या यरुशलेम नगरांवरून, तुमच्या पवित्र डोंगरावरील तुझ्या विश्वसनीय करुणेमुळे यरुशलेमवरील, तुझ्या स्वतःच्या नगरीवरील, तुझ्या पवित्र डोंगरावरील, तुमचा क्रोध आणि राग दूर करा. कारण आमच्या पातकांमुळे आणि आमच्या पूर्वजांच्या अपराधांमुळे यरुशलेम आणि तुमचे लोक सभोवतालच्या सर्वांना निंदा असे झालो आहोत.

  20. दानीएल ९:१७सुमारे इ.स.पू. ५३८

    “आता हे आमच्या परमेश्वरा, आपल्या दासाची प्रार्थना आणि विनवणी ऐका. याहवेह, उजाड झालेल्या तुमच्या पवित्रस्थानावर तुमचे मुखतेज पडू द्या.

  21. दानीएल ९:१८सुमारे इ.स.पू. ५३८

    हे आमच्या परमेश्वरा कान द्या आणि ऐका; आपले डोळे उघडा आणि ज्या नगरास तुमचे नाव दिले आहे ते कसे उद्ध्वस्त झाले आहे ते पाहा. आम्ही नीतिमान आहोत म्हणून विनवणी करीत आहोत असे नाही, परंतु तुमची दया विपुल आहे.

  22. दानीएल ९:१९सुमारे इ.स.पू. ५३८

    हे याहवेह, ऐका! हे याहवेह, क्षमा करा! हे याहवेह, ऐका आणि कृती करा. अहो माझ्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या स्वतःकरिता विलंब करू नका, कारण तुमच्या नगराला आणि तुमच्या लोकांना तुमचे नाव दिले आहे.”

  23. दानीएल ९:२०सुमारे इ.स.पू. ५३८

    जेव्हा मी माझे पाप आणि आपल्या इस्राएली लोकांचे पाप कबूल करीत बोलत आणि प्रार्थना करीत होतो आणि याहवेह माझ्या परमेश्वर यांची त्यांच्या पवित्र डोंगरासाठी प्रार्थना करीत होतो;

  24. दानीएल ९:२१सुमारे इ.स.पू. ५३८

    जेव्हा मी प्रार्थना करीतच होतो, गब्रीएल ज्याला मी आधीच्या दृष्टान्तात पाहिले होते, संध्याकाळच्या अर्पणासमयी माझ्याकडे आला;

  25. दानीएल ९:२२सुमारे इ.स.पू. ५३८

    त्याने मला समज दिली आणि मला म्हटले, “दानीएला, आता मी तुला ज्ञान आणि समज देण्यासाठी आलो आहे.