मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दानीएल ७:३सुमारे इ.स.पू. ५५५

    चार महाकाय पशू समुद्रातून वर आले. प्रत्येक पशू एकमेकांपासून वेगळा होता.

  2. दानीएल ७:४सुमारे इ.स.पू. ५५५

    “पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले.

  3. दानीएल ७:५सुमारे इ.स.पू. ५५५

    “आणि तिथे मी माझ्यापुढे दुसरा पशू पाहिला, जो अस्वलासारखा दिसत होता. त्याच्या शरीराची एका बाजू वर उचललेली होता. त्याने आपल्या दातांमध्ये तीन फासळ्या धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले, ‘ऊठ! पोटभर मांस खा!’

  4. दानीएल ७:६सुमारे इ.स.पू. ५५५

    “यानंतर मी पाहिले तो, मला आणखी एक पशू माझ्यापुढे दिसला, तो एखाद्या चित्त्यासारखा दिसत होता. त्याच्या पाठीवर पक्ष्यांसारखे चार पंख होते. या पशूला चार डोकी होती आणि सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता.

  5. दानीएल ७:७सुमारे इ.स.पू. ५५५

    “यानंतर रात्री मी दृष्टान्तात पाहत होतो आणि तिथे माझ्यापुढे चौथा पशू होता—तो भयंकर आणि विक्राळ आणि फार बलिष्ठ होता. त्याला मोठे लोखंडी दात होते; त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. पूर्वीच्या सर्व पशूपेक्षा हा पशू वेगळा होता. त्याला दहा शिंगे होती.

  6. दानीएल ७:८सुमारे इ.स.पू. ५५५

    “या शिंगांविषयी मी विचार करीत असता, त्या शिंगांमध्ये आणखी एक लहान शिंग उगवले आणि आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगांना या नव्या शिंगाने मुळासकट उपटून टाकले. या शिंगाला माणसासारखे डोळे होते आणि बढाई करणारे तोंडही होते.

  7. दानीएल ७:९सुमारे इ.स.पू. ५५५

    “जसे मी पाहिले, “सिंहासने मांडली गेली आणि प्राचीन पुरुष आपल्या आसनावर बसला आहे. त्याची वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती; त्याच्या मस्तकावरील केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. त्याचे सिंहासन अग्निज्वालायुक्त होते, आणि त्याच्या सिंहासनाची चाके प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणे होती.

  8. दानीएल ७:१०सुमारे इ.स.पू. ५५५

    अग्नीची नदी निघून वाहत होती जी त्याच्यामधून बाहेर येत होती. हजारोच्या हजार लोक त्याची सेवा करीत होते; कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आणि पुस्तके उघडली गेली.

  9. दानीएल ७:११सुमारे इ.स.पू. ५५५

    “मग मी सतत त्याच्याकडे पाहत होतो कारण ते शिंग फुशारकीचे शब्द बोलत होते. मी सतत पाहत राहिलो जोपर्यंत चौथ्या पशूचे वध करण्यात आले नाही आणि त्याचे शरीर अग्निज्वालांमध्ये फेकण्यात आले नाही.

  10. दानीएल ७:१२सुमारे इ.स.पू. ५५५

    (इतर पशूंचे अधिकार काढून घेण्यात आले, परंतु त्यांना आणखी काही काळ जिवंत राहण्याची परवानगी देण्यात आली.)

  11. दानीएल ७:१३सुमारे इ.स.पू. ५५५

    “नंतर रात्री दृष्टान्तात पाहत होतो आणि मी पाहिले, मानवपुत्रासारखा आकाशात मेघारूढ होऊन येत असलेला दिसला. तो प्राचीन पुरुषाकडे गेला आणि त्याच्या उपस्थितीत त्याला सादर करण्यात आले.

  12. दानीएल ७:१४सुमारे इ.स.पू. ५५५

    त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.

  13. दानीएल ७:१५सुमारे इ.स.पू. ५५५

    “मी, दानीएल, माझ्या आत्म्यात खूप व्यथित झालो आणि मी माझ्या मनात जो दृष्टान्त पाहिला, त्यामुळे मी गोंधळून गेलो.

  14. दानीएल ७:१६सुमारे इ.स.पू. ५५५

    मी तिथे उभ्या असलेल्यांपैकी एकाकडे गेलो आणि मी त्याला या सर्व गोष्टींचा अर्थ काय हे विचारले. “मग त्याने मला सांगितले व गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला:

  15. दानीएल ७:१७सुमारे इ.स.पू. ५५५

    ‘हे चार महाकाय पशू म्हणजे पृथ्वीवर उदय पावणारे चार राजे आहेत.

  16. दानीएल ७:१८सुमारे इ.स.पू. ५५५

    तरी परमोच्च परमेश्वराच्या पवित्र जणांना राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ त्याच्या ताब्यात राहतील—होय, सदासर्वकाळ.’

  17. दानीएल ७:१९सुमारे इ.स.पू. ५५५

    “मग मला चौथ्या प्राण्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता, जो इतर सर्व पशूंपेक्षा वेगळा होता. तो आपल्या लोखंडी दातांनी आणि कास्याच्या नखांमुळे अति भयानक होता—त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले.

  18. दानीएल ७:२०सुमारे इ.स.पू. ५५५

    मला हे देखील जाणून घ्यायचे होते की त्याच्या डोक्यावर असलेली दहा शिंगे आणि दुसरे शिंग जे बाहेर आले, त्यापैकी तीन शिंगे बाहेर आल्यावर पडली. मला त्या दहा शिंगांविषयी आणि जे शिंग नंतर आले, ज्याच्या येण्याने तेथील तीन शिंगे तुटून पडली—ते शिंग जे इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसले आणि ज्याला डोळे होते व फुशारकी मारणारे बढाईखोर तोंड होते, मला हे जाणून घ्यायचे होते.

  19. दानीएल ७:२१सुमारे इ.स.पू. ५५५

    मी पाहिले की, हे शिंग पवित्र लोकांशी युद्ध करीत आहे आणि त्यांचा पराभव करीत राहिले,

  20. दानीएल ७:२२सुमारे इ.स.पू. ५५५

    जोपर्यंत सनातन पुरुष येईपर्यंत आणि परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांच्या बाजूने निर्णय घोषित होईपर्यंत, त्यांनी राज्य ताब्यात घेण्याची वेळ आली.

  21. दानीएल ७:२३सुमारे इ.स.पू. ५५५

    “त्याने मला हे स्पष्टीकरण दिले: ‘हा चौथा पशू म्हणजे हे चौथे राज्य होईल जे पृथ्वीवर प्रकट होईल. ते सर्व राज्याहून निराळे होईल आणि ते संपूर्ण पृथ्वीला गिळंकृत करेल, तिला तुडवून टाकेल, आणि तिचे तुकडे करेल.

  22. दानीएल ७:२४सुमारे इ.स.पू. ५५५

    ती दहा शिंगे म्हणजे दहा राजे. जे या राज्यातून येतील. यानंतर आणखी एक राजा येईल, जो आधीच्या राजांपेक्षा भिन्न असणार; तो या तिघांना वश करेल.

  23. दानीएल ७:२५सुमारे इ.स.पू. ५५५

    तो परमोच्च परमेश्वराच्या विरुद्ध बोलेल आणि त्यांच्या पवित्र लोकांवर अत्याचार करेल आणि निर्धारित वेळ आणि कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र लोक एक वेळ, दोन वेळा आणि अर्धा वेळ त्याच्या हातात देण्यात येतील.

  24. दानीएल ७:२६सुमारे इ.स.पू. ५५५

    “ ‘परंतु न्यायसभा बसेल आणि त्याचे सामर्थ्य काढून घेण्यात येईल आणि त्याचा कायमचा नाश करण्यात येईल.

  25. दानीएल ७:२७सुमारे इ.स.पू. ५५५

    मग परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांना आकाशाखाली असलेल्या राज्यांचे सार्वभौमत्व, सामर्थ्य आणि महानता देण्यात येईल. त्यांचे राज्य सनातन राज्य आहे आणि सर्व शासक त्यांची सेवा करतील व त्यांच्या आज्ञा पाळतील.’