- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय २३:२१सुमारे इ.स.पू. १४९०
त्याच दिवशी तुम्ही एक पवित्र सभा भरवा आणि नियमित कामे करू नका. तुम्ही कुठेही राहिले तरी तुमच्या सर्व भावी पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
- लेवीय २३:२२सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुम्ही आपल्या जमिनीतील पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्यातील पिकांची कापणी करू नये किंवा खाली पडलेले धान्य गोळा करू नये. हे गरिबांसाठी व तुम्हामध्ये राहणार्या परदेशीयांसाठी ते तसेच राहू द्यावे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
- लेवीय २३:२३सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय २३:२४सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकास सांग: ‘सातव्या महिन्याचा पहिला दिवस तुम्ही शब्बाथ विश्रांतीसाठी ठेवावा, या दिवशी पवित्र मेळावा करून स्मृतिदिन म्हणून कर्णे फुंकावेत.
- लेवीय २३:२५सुमारे इ.स.पू. १४९०
या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ”
- लेवीय २३:२६सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय २३:२७सुमारे इ.स.पू. १४९०
“सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे.
- लेवीय २३:२८सुमारे इ.स.पू. १४९०
या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल.
- लेवीय २३:२९सुमारे इ.स.पू. १४९०
जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.
- लेवीय २३:३०सुमारे इ.स.पू. १४९०
जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन.
- लेवीय २३:३१सुमारे इ.स.पू. १४९०
कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
- लेवीय २३:३२सुमारे इ.स.पू. १४९०
तो दिवस तुमच्यासाठी शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे. महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढील संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचा शब्बाथ पाळावा.”
- लेवीय २३:३३सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय २३:३४सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांना सांग: ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून याहवेहकरिता मंडपाचा सण सात दिवस पाळावा.
- लेवीय २३:३५सुमारे इ.स.पू. १४९०
पहिला दिवस हा पवित्र मेळावा आहे. कोणतेही नियमित काम या दिवशी करू नये.
- लेवीय २३:३६सुमारे इ.स.पू. १४९०
सात दिवस याहवेहला अन्नार्पण करा आणि आठव्या दिवशी पवित्र मेळावा भरवून याहवेहला अन्नार्पण करा. हा मेळाव्याचा समारोप आहे; कोणतेही नियमित काम करू नका.
- लेवीय २३:३७सुमारे इ.स.पू. १४९०
(“ ‘हे याहवेहने स्थापित केलेले सण आहेत, जे तुम्ही याहवेहला अन्नार्पण करण्यासाठी पवित्र मेळावे घोषित करावे; होमार्पण, धान्यार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण आवश्यक त्या दिवशी अर्पणे करावी.
- लेवीय २३:३८सुमारे इ.स.पू. १४९०
ही अर्पणे याहवेहच्या शब्बाथांच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे यज्ञ तुम्ही परमेश्वराला अर्पण करता त्या तुमच्या देणग्या आणि नवस फेडावयाची अर्पणे आणि स्वैच्छिक अर्पणे त्या व्यतिरिक्त आहेत.)
- लेवीय २३:३९सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जेव्हा तुम्ही जमिनीचे पीक गोळा कराल, तेव्हा सात दिवस याहवेहपुढे सण पाळावा. पहिला दिवस हा शब्बाथ, विश्रामदिन आणि आठवा दिवसही शब्बाथाचा विश्रामदिन असेल.
- लेवीय २३:४०सुमारे इ.स.पू. १४९०
पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा.
- लेवीय २३:४१सुमारे इ.स.पू. १४९०
हा सात दिवसांचा वार्षिक सण तुम्ही याहवेहसाठी प्रत्येक वर्षी पाळावा. हा सर्वकाळचा नियम येणार्या पिढ्यांसाठी आहे; सातव्या महिन्यात हा सण साजरा करावा.
- लेवीय २३:४२सुमारे इ.स.पू. १४९०
या सात दिवसात इस्राएली वंशातील सर्वांनी डहाळ्याच्या मंडपात राहावे
- लेवीय २३:४३सुमारे इ.स.पू. १४९०
यासाठी की, तुमच्या भावी पिढीला हे कळावे की, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्याला इजिप्तमधून बाहेर काढले तेव्हा मी त्यांना मंडपात राहायला लावले. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
- लेवीय २३:४४सुमारे इ.स.पू. १४९०
अशाप्रकारे याहवेहनी नेमून दिलेले हे वार्षिक सण मोशेने इस्राएली लोकांना जाहीर केले.
- लेवीय २४:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,