- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय २२:४सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,
- लेवीय २२:५सुमारे इ.स.पू. १४९०
किंवा जमिनीवर सरपटणार्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल.
- लेवीय २२:६सुमारे इ.स.पू. १४९०
अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये.
- लेवीय २२:७सुमारे इ.स.पू. १४९०
सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे.
- लेवीय २२:८सुमारे इ.स.पू. १४९०
मृत पावलेले किंवा जंगली प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस त्याने खाऊन अशुद्ध होऊ नये. मी याहवेह आहे.
- लेवीय २२:९सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘याजकांनी माझी सेवा काळजीपूर्वक करावी, नाहीतर माझी सेवा निंदापूर्वक केल्याने त्यांना दोषी ठरवून मरणदंड भोगावा लागेल. त्यांना पवित्र करणारा मी याहवेह आहे.
- लेवीय २२:१०सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘याजकाच्या कुटुंबा बाहेरील इतर कोणीही, त्याच्याकडे आलेले पाहुणे किंवा त्याच्याकडे काम करणारे मजूर यांनी पवित्र अर्पणांतील कोणताही पदार्थ खाऊ नये.
- लेवीय २२:११सुमारे इ.स.पू. १४९०
पण याजकाने स्वतःच्या पैशाने गुलाम विकत घेतला असेल किंवा जर त्या गुलामांनी याजकाच्या घरात जन्म घेतला असेल, ते त्याचे अन्न खाऊ शकतील.
- लेवीय २२:१२सुमारे इ.स.पू. १४९०
जर याजकाच्या कन्येचा विवाह याजकासोबत झाला नसून, दुसर्यासोबत झाला असेल तर तिने पवित्र अर्पणांतील पदार्थ खाऊ नयेत.
- लेवीय २२:१३सुमारे इ.स.पू. १४९०
पण जर याजकाची मुलगी विधवा किंवा पतीने सोडलेली असून तिला पुत्र नसेल आणि ती तरुणपणी पुन्हा आपल्या पित्याच्या घरात येऊन राहत असेल, तर मात्र तिने आपल्या पित्याच्या घरातील अन्न खावे. तथापि, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने हे अन्न खाऊ नये.
- लेवीय २२:१४सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘एखाद्याने चुकून पवित्र अर्पणांतील काही पदार्थ खाल्ले, तर त्याने जितके पदार्थ खाल्ले असतील तितके सर्व आणि पाचव्या हिश्शाइतका पदार्थाचा भाग याजकाला द्यावा.
- लेवीय २२:१५सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएली लोकांनी याहवेहला अर्पिलेली पवित्र अर्पणे, याजकाने भ्रष्ट करू नयेत,
- लेवीय २२:१६सुमारे इ.स.पू. १४९०
ती पवित्र अर्पणे खाण्यास मनाई न केल्यास पापदंड भरण्याची शिक्षा त्यांच्यावर ते ओढवून घेतील; मी याहवेह आहे, जो त्यांना पवित्र करतो.’ ”
- लेवीय २२:१७सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय २२:१८सुमारे इ.स.पू. १४९०
“अहरोन, त्याचे पुत्र व इस्राएली लोकांना सांग, ‘जर तुमच्यापैकी—इस्राएली लोकांपैकी किंवा इस्राएलात राहणारे विदेशी यापैकी कोणीही—याहवेहला वचनपूर्तीचे किंवा स्वैच्छिक होमार्पण आणले,
- लेवीय २२:१९सुमारे इ.स.पू. १४९०
तर ते तुमच्यावतीने मान्य होण्यासाठी निर्दोष गोर्हा, मेंढा किंवा बोकड यांचेच असावे.
- लेवीय २२:२०सुमारे इ.स.पू. १४९०
दोष असलेला कोणताही प्राणी अर्पण करू नये, कारण ते तुमच्यावतीने मान्य केले जाणार नाहीत.
- लेवीय २२:२१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहसाठी कोणी स्वतःच्या गुरांतून किंवा शेरडामेंढरांतून शपथपूर्तीचे किंवा स्वखुशीचे शांत्यर्पण करेल, तर ते मान्य होण्यासाठी ते निर्दोष प्राण्याचेच असावे.
- लेवीय २२:२२सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहला आंधळा, हाड तुटलेला, लुळा किंवा अंगावर मस, इसब अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी अर्पण करू नका. यापैकी काहीही वेदीवर याहवेहला हवन म्हणून अर्पण ठेऊ नका.
- लेवीय २२:२३सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही एखाद्या गोर्ह्याला किंवा मेंढ्याला, एखादा अवयव जास्त वा कमी असेल, तर तो प्राणी स्वखुशीचे अर्पण म्हणून चालेल, पण शपथपूर्तीचे अर्पण म्हणून तो अर्पण करता येणार नाही.
- लेवीय २२:२४सुमारे इ.स.पू. १४९०
ज्या प्राण्याचे अंडकोश ठेचलेले किंवा चिरडलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले असेल, त्याचे अर्पण याहवेहला कधीही करू नये. तुमच्या स्वतःच्या देशात असे करू नका.
- लेवीय २२:२५सुमारे इ.स.पू. १४९०
आणि तुम्ही अशा प्रकारचे प्राणी परराष्ट्रीयांकडून घेऊ नयेत आणि तुमच्या परमेश्वरासाठी अन्नार्पण करू नये. ते तुमच्यावतीने स्वीकारले जाणार नाहीत, कारण ते विकृत आहेत आणि त्यांच्यात दोष आहेत.’ ”
- लेवीय २२:२६सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय २२:२७सुमारे इ.स.पू. १४९०
“वासरू, कोकरू वा करडू जन्मले असताना ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू द्यावे; आठव्या दिवसापासून याहवेहला अन्नार्पण करण्यास योग्य ठरेल.
- लेवीय २२:२८सुमारे इ.स.पू. १४९०
गाई व तिचे वासरू किंवा मेंढी व तिचे करडू यांचा एकाच दिवशी वध करू नये.