- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय २२:२९सुमारे इ.स.पू. १४९०
“ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा.
- लेवीय २२:३०सुमारे इ.स.पू. १४९०
त्याच दिवशी ते खाऊन टाकावे; त्यातील काहीही सकाळपर्यंत ठेवू नये. मी याहवेह आहे.
- लेवीय २२:३१सुमारे इ.स.पू. १४९०
“तुम्ही माझ्या सर्व आज्ञा पाळाव्यात; मी याहवेह आहे.
- लेवीय २२:३२सुमारे इ.स.पू. १४९०
माझ्या पवित्र नावाला अपवित्र करू नका, कारण मला इस्राएली लोकांनी पवित्र म्हणून ओळखावे. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला पवित्र केले
- लेवीय २२:३३सुमारे इ.स.पू. १४९०
आणि ज्याने तुमचा परमेश्वर होण्यासाठी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. मी याहवेह आहे.”
- लेवीय २३:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय २३:२सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘हे मी नेमून दिलेले सण आहेत, याहवेहचे नेमून दिलेले सण, जे तुम्ही पवित्र मेळावे असे जाहीर करावे.
- लेवीय २३:३सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘आठवड्यातील सहा दिवस त्यांनी कामकाज करावे, परंतु सातवा दिवस हा शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे. पवित्र मेळाव्याचा दिवस. तुम्ही कोणतेही काम करू नये; तुम्ही कुठेही राहत असाल तरी याहवेहसाठी हा शब्बाथ आहे.
- लेवीय २३:४सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘याहवेहने नेमून दिलेले हे पवित्र सण आहेत, पवित्र मेळाव्यांची घोषणा तुम्ही त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळांमध्ये करावी:
- लेवीय २३:५सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहच्या वल्हांडण सणाची सुरुवात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून होते.
- लेवीय २३:६सुमारे इ.स.पू. १४९०
त्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी याहवेहचा बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; सात दिवस खमीर नसलेली भाकर खावी.
- लेवीय २३:७सुमारे इ.स.पू. १४९०
पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतीही नियमित कामे करू नये.
- लेवीय २३:८सुमारे इ.स.पू. १४९०
सात दिवस याहवेहसाठी अन्नार्पण द्यावे. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.’ ”
- लेवीय २३:९सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय २३:१०सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी जो देश तुम्हाला देणार आहे, जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश कराल आणि पिकांची कापणी कराल, तेव्हा तुम्ही कापणी केलेल्या पहिल्या धान्याची एक पेंढी याजकाकडे आणावी.
- लेवीय २३:११सुमारे इ.स.पू. १४९०
त्याने याहवेहसमोर पेंढी ओवाळावी, जेणेकरून ते तुमच्यावतीने मान्य केले जाईल; शब्बाथाच्या दुसर्या दिवशी याजकाने ते ओवाळावे.
- लेवीय २३:१२सुमारे इ.स.पू. १४९०
आता ज्या दिवशी तुम्ही पेंढी ओवाळाल, त्याच दिवशी तुम्ही याहवेहला एक वर्षाच्या निर्दोष कोकर्याचे होमार्पण करावे.
- लेवीय २३:१३सुमारे इ.स.पू. १४९०
त्याच्या धान्यासोबत, जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग जैतुनाच्या तेलात मळून अर्पावा; हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. त्यासोबत पावशेर हीन द्राक्षारसही याहवेहला अर्पण करावा.
- लेवीय २३:१४सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही आपल्या परमेश्वराला हे सर्व अर्पण आणल्याशिवाय पिकातील कोणताही भाग म्हणजे कोवळी कणसे, त्या धान्याच्या भाकरी किंवा भाजलेले दाणे यापैकी काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहिले तरी येणार्या पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
- लेवीय २३:१५सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘शब्बाथाच्या दुसर्या दिवशी, तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुढे पूर्ण सात आठवडे मोजावे.
- लेवीय २३:१६सुमारे इ.स.पू. १४९०
पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे.
- लेवीय २३:१७सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही कुठेही राहत असाल तरी अर्पण म्हणून दोन भाकरी आणाव्यात. एका एफाच्या दहा भागातील दोन भाग सपिठाच्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात, पहिल्या उत्पन्नातून ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी असे अर्पण आणावे.
- लेवीय २३:१८सुमारे इ.स.पू. १४९०
या भाकरीबरोबर तुम्ही एक वर्षाची सात निर्दोष नरकोकरे, एक गोर्हा व दोन मेंढे अर्पावे, ते पेयार्पण व अन्नार्पणासह याहवेहला एक होमार्पण असतील, याहवेहला प्रसन्न करणारा एक सुगंध होमार्पण.
- लेवीय २३:१९सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने पापार्पणासाठी एक बोकड व शांत्यर्पणासाठी एक वर्षांचे दोन मेंढे अर्पण करावे.
- लेवीय २३:२०सुमारे इ.स.पू. १४९०
याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल.