मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय २५:४सुमारे इ.स.पू. १४९१

    पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका.

  2. लेवीय २५:५सुमारे इ.स.पू. १४९१

    आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील.

  3. लेवीय २५:६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या शब्बाथाच्या वर्षी जमीन जे काही पीक येईल ते सर्वांना म्हणजेच तुम्ही, तुमचे नोकरचाकर, तुमच्याकडे असलेले गुलाम आणि तुमच्यात राहणारा कोणीही परदेशीय यांना खाण्याची मोकळीक आहे.

  4. लेवीय २५:७सुमारे इ.स.पू. १४९१

    तसेच जनावरे, वनपशू या दोघांनाही तिथे चरावयाची मोकळीक आहे.

  5. लेवीय २५:८सुमारे इ.स.पू. १४९१

    “ ‘तुम्ही सात शब्बाथ वर्षे मोजावे; म्हणजेच सात वेळा सात वर्षे; म्हणजे सात शब्बाथ वर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होईल.

  6. लेवीय २५:९सुमारे इ.स.पू. १४९१

    मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी तुम्ही सर्वत्र कर्णे फुंकावे. प्रायश्चित्ताच्या दिवशी संपूर्ण देशात तुम्ही मोठ्या आवाजाचे कर्णे दीर्घकाल वाजवावे.

  7. लेवीय २५:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे.

  8. लेवीय २५:११सुमारे इ.स.पू. १४९१

    पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये.

  9. लेवीय २५:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    कारण हे योबेल वर्ष असेल आणि हे तुमच्याकरिता पवित्र असेल; शेतात आपोआप उगविलेले पीक तुम्ही खावे.

  10. लेवीय २५:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    “ ‘या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपल्या स्वतःच्या वतनात परत जावे.

  11. लेवीय २५:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    “ ‘यासाठी की तुम्ही जेव्हा आपल्या लोकांना जमीन विकाल किंवा त्याच्याकडून विकत घ्याल, तेव्हा तुमच्याकडून अन्यायाचा व्यवहार होऊ नये.

  12. लेवीय २५:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    योबेल वर्षानंतरच्या वर्षांच्या संख्येच्या आधारावर तुम्ही तुमच्या लोकांकडून विकत घ्यावयाची आणि पीक कापणीसाठी किती वर्षे शिल्लक आहेत या आधारावर त्याची तुम्हाला विक्री करावयाची आहे.

  13. लेवीय २५:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    जर वर्षे अनेक असतील तर जमिनीची किंमत त्या मानाने जास्त असेल, परंतु ही वर्षे थोडी असल्यास तिची किंमत त्या मानाने कमी असेल; कारण खरोखर विक्री जमिनीची होत नाही, तर ती जमीन किती वेळा पिके देऊ शकेल यावर तिची किंमत अवलंबून राहील.

  14. लेवीय २५:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  15. लेवीय २५:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    “ ‘माझ्या आज्ञांचे पालन करा आणि माझे विधीचे पालन करण्याची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही देशात सुरक्षितपणे राहाल.

  16. लेवीय २५:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    भूमी भरपूर पीक देईल आणि तुम्ही भरपूर खाल आणि सुरक्षित राहाल.

  17. लेवीय २५:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही असे विचाराल, “जर आम्ही झाडे लावली नाही किंवा आमच्या पिकांची कापणी केली नाही, तर आम्ही सातव्या वर्षी काय खावे?”

  18. लेवीय २५:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    मी तुम्हाला असे आशीर्वादित करेन की जमीन सहाव्या वर्षी तीन वर्षापर्यंत पर्याप्‍त असे पीक देईल.

  19. लेवीय २५:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    आठव्या वर्षी जेव्हा तुम्ही बी पेराल, तेव्हा तुम्ही मागच्या वर्षात गोळा केलेले पीक खात राहाल आणि नवव्या वर्षाचे पीक येईपर्यंत तुम्ही ते खाऊ शकाल.

  20. लेवीय २५:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    “ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात.

  21. लेवीय २५:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमच्या ताब्यात असलेली संपूर्ण जमीन, तुम्ही त्या जमिनीला सोडविण्याची तरतूद केली पाहिजे.

  22. लेवीय २५:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    “ ‘तुमचा इस्राएली सहकारी गरीब झाला आणि त्याने त्यांची काही मालमत्ता विकली, तर त्यांच्या जवळच्या नातलगाने ती खंडणी भरून सोडवून घ्यावी.

  23. लेवीय २५:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    जर सोडवून घेणारा त्याला कोणी नातलग नसला आणि त्याला स्वतःलाच ती खंडणी भरून सोडवून घेण्याची ऐपत वाढली,

  24. लेवीय २५:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    तर योबेल वर्षापर्यंत जमीन आणखी किती वर्षे पीक देऊ शकेल हे पाहून त्या प्रमाणात तिची किंमत भरावी. जमिनीच्या सध्याच्या मालकाने तितके पैसे घेऊन तिच्या मूळ मालकाला ती परत करावी.

  25. लेवीय २५:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे.