circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 तीमथ्य २:१५सुमारे इ.स. ६५
म्हणून मुलांना जन्म देताना तिचे तारण होईल, ती नेमस्तपणाने विश्वास, प्रीती आणि पवित्रपण यामध्ये राहिल्याने हे होईल.
- 1 तीमथ्य ३:१सुमारे इ.स. ६५
हे वचन विश्वासयोग्य आहे की जर कोणी अध्यक्ष होण्याची इच्छा धरतो, तर तो उत्तम कामाची इच्छा बाळगतो.
- 1 तीमथ्य ३:२सुमारे इ.स. ६५
तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा.
- 1 तीमथ्य ३:३सुमारे इ.स. ६५
तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा.
- 1 तीमथ्य ३:४सुमारे इ.स. ६५
तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे.
- 1 तीमथ्य ३:५सुमारे इ.स. ६५
(ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तर तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल?)
- 1 तीमथ्य ३:६सुमारे इ.स. ६५
अध्यक्ष नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, नाही तर तो गर्वाने फुगून जाऊन सैतानाच्या दंडाचा भागीदार होईल.
- 1 तीमथ्य ३:७सुमारे इ.स. ६५
तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये.
- 1 तीमथ्य ३:८सुमारे इ.स. ६५
मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे.
- 1 तीमथ्य ३:९सुमारे इ.स. ६५
ते विश्वासाचे गुप्त सत्य शुद्ध विवेकबुद्धीने राखणारे असावेत.
- 1 तीमथ्य ३:१०सुमारे इ.स. ६५
आणि त्यांची प्रथम चाचणी करणे आवश्यक आहे; नंतर निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवक म्हणून काम करावे.
- 1 तीमथ्य ३:११सुमारे इ.स. ६५
त्याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीदेखील आदरणीय असाव्यात. त्या निंदानालस्ती करणार्या असू नयेत, तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात.
- 1 तीमथ्य ३:१२सुमारे इ.स. ६५
सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा.
- 1 तीमथ्य ३:१३सुमारे इ.स. ६५
ज्यांनी सेवकपणाची सेवा चांगली केली, त्यांना मान मिळतो आणि ख्रिस्त येशूंवरील त्यांची विश्वासात दृढता वाढते.
- 1 तीमथ्य ३:१४सुमारे इ.स. ६५
तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा असूनही, या सर्वगोष्टी मी आताच तुला लिहित आहे,
- 1 तीमथ्य ३:१५सुमारे इ.स. ६५
जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
- 1 तीमथ्य ३:१६सुमारे इ.स. ६५
सुभक्तीचे रहस्य निर्विवाद गंभीर आहे: परमेश्वर मानव शरीरात प्रकट झाले, आत्म्यात नीतिमान ठरले; देवदूतांच्या पाहण्यात आले, राष्ट्रांमध्ये गाजविले गेले, जगात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि गौरवात पुन्हा वर घेतले गेले.
- 1 तीमथ्य ४:१सुमारे इ.स. ६५
पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील.
- 1 तीमथ्य ४:२सुमारे इ.स. ६५
ज्या लबाड बोलणार्या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली आहे.
- 1 तीमथ्य ४:३सुमारे इ.स. ६५
हे लोक विवाह करण्यास मनाई करतील, जे अन्न विश्वासणार्यांनी आणि सत्य जाणणार्यांनी उपकारस्तुती करून स्वीकार करावे म्हणून परमेश्वराने निर्माण केले आहे ते वर्ज्य करावे, असे ते म्हणतील.
- 1 तीमथ्य ४:४सुमारे इ.स. ६५
परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले तर काहीही वर्ज्य नाही.
- 1 तीमथ्य ४:५सुमारे इ.स. ६५
कारण परमेश्वराचे वचन आणि मध्यस्थी प्रार्थना यांनी ती समर्पित होते.
- 1 तीमथ्य ४:६सुमारे इ.स. ६५
जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील.
- 1 तीमथ्य ४:७सुमारे इ.स. ६५
मूर्ख कल्पना, खुळ्या लोककथा यापासून दूर राहा आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रशिक्षण घे.
- 1 तीमथ्य ४:८सुमारे इ.स. ६५
शारीरिक व्यायाम योग्य आहे, परंतु आध्यात्मिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे, कारण हे सद्य जीवनाचे आणि भावी जीवनाचे अभिवचन देते.