circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 तीमथ्य ५:१८सुमारे इ.स. ६५
कारण पवित्रशास्त्र म्हणते, “बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको” आणि “कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!”
- 1 तीमथ्य ५:१९सुमारे इ.स. ६५
दोन किंवा तीन साक्षीदारांनी आरोप ठेवल्याशिवाय वडिलांविरुद्धच्या तक्रारीकडे लक्ष देऊ नये.
- 1 तीमथ्य ५:२०सुमारे इ.स. ६५
जे वडील पाप करीत असतात त्यांचा सर्वांच्यासमक्ष निषेध कर म्हणजे इतरांना त्याचे भय राहील.
- 1 तीमथ्य ५:२१सुमारे इ.स. ६५
परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आणि निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, या सूचना कोणताही भेदभाव न करता पाळ. पक्षपाताने काहीही करण्यात येऊ नये.
- 1 तीमथ्य ५:२२सुमारे इ.स. ६५
अध्यक्ष निवडण्यात कधीही घाई करू नको. इतरांच्या पापात सहभागी होऊ नको आणि तू स्वतःस शुद्ध राख.
- 1 तीमथ्य ५:२३सुमारे इ.स. ६५
यापुढे पाणीच पीत राहू नकोस, तर कधीकधी तू थोडासा द्राक्षारस घेत जा, कारण पोटाच्या विकाराने तू वारंवार आजारी असतोस.
- 1 तीमथ्य ५:२४सुमारे इ.स. ६५
अनेक माणसांची पापे आधीच उघड होतात आणि न्यायनिवाड्यासाठी त्यांच्यापुढे जातात आणि कित्येकांची पापे त्यांच्यामागून जातात.
- 1 तीमथ्य ५:२५सुमारे इ.स. ६५
अशाच प्रकारे काही चांगली कार्ये आधी उघड होतात आणि जी इतर प्रकारची आहेत, ती कायमची गुप्त राहू शकत नाहीत.
- 1 तीमथ्य ६:१सुमारे इ.स. ६५
जे दास म्हणून जुवाखाली आहेत त्यांनी आपआपल्या धन्यास सर्व सन्मानास योग्य मानावे, यासाठी की परमेश्वराच्या नावाची आणि शिकवणीची निंदा होऊ नये.
- 1 तीमथ्य ६:२सुमारे इ.स. ६५
त्यांचा धनी विश्वासणारा असल्यास त्यांना ते बंधूसारखे आहेत, त्यांनी त्यांचा अवमान करू नये, उलट जास्त आदराने सेवा करावी, कारण जे तुमच्या सेवेचा लाभ घेणारे आहेत ते विश्वासणारे व प्रिय आहेत. या गोष्टी त्यांना शिकवून पालन करण्यास सांग.
- 1 तीमथ्य ६:३सुमारे इ.स. ६५
जर कोणी, इतर कोणतेही मत शिकवितो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा योग्य बोध आणि सुभक्तीचे शिक्षण मान्य करीत नाही,
- 1 तीमथ्य ६:४सुमारे इ.स. ६५
तर तो अहंकारी आहे व त्याला काहीच समजत नाही. त्याला शब्दयुद्ध व वादविवाद यांची विकृत आवड आहे. यांच्यापासूनच हेवा, कलह, कोणाची बदनामी होईल असे बोलणे, दुष्ट संशय,
- 1 तीमथ्य ६:५सुमारे इ.स. ६५
आणि ज्यांच्यापासून सत्य हिरावून घेतले आहे आणि ज्यांना भक्ती द्रव्यलोभाचे एक साधन वाटते, अशा भ्रष्ट मनाच्या माणसांमध्ये सतत भांडणे होतात.
- 1 तीमथ्य ६:६सुमारे इ.स. ६५
परंतु संतोषासहित असणारी सुभक्ती ही मोठीच मिळकत आहे.
- 1 तीमथ्य ६:७सुमारे इ.स. ६५
कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही.
- 1 तीमथ्य ६:८सुमारे इ.स. ६५
म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्र असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे.
- 1 तीमथ्य ६:९सुमारे इ.स. ६५
जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि पाशात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात.
- 1 तीमथ्य ६:१०सुमारे इ.स. ६५
कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे.
- 1 तीमथ्य ६:११सुमारे इ.स. ६५
परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
- 1 तीमथ्य ६:१२सुमारे इ.स. ६५
विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे.
- 1 तीमथ्य ६:१३सुमारे इ.स. ६५
सर्वांना जीवन देणार्या परमेश्वरासमक्ष आणि पंतय पिलातासमोर निर्भयपणाने साक्ष देणार्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आज्ञा करतो
- 1 तीमथ्य ६:१४सुमारे इ.स. ६५
आपले प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत या आज्ञा दोषरहित आणि निर्दोष ठेव.
- 1 तीमथ्य ६:१५सुमारे इ.स. ६५
परमेश्वर जे योग्य समयी त्याला पूर्ण करतील, परमेश्वर जे धन्यवादित व एकच सर्वसमर्थ, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जे अगम्य प्रकाशात राहतात, ज्यांना कोणीही पाहिले नाही, आणि कोणीही पाहू शकत नाही; त्यांना सदासर्वकाळ गौरव आणि चिरकाल सामर्थ्य असो. आमेन.
- 1 तीमथ्य ६:१६सुमारे इ.स. ६५
Who only hath immortality, dwelling in the light which no man can approach unto; whom no man hath seen, nor can see: to whom be honour and power everlasting. Amen.
- 1 तीमथ्य ६:१७सुमारे इ.स. ६५
जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा.