मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 तीमथ्य ४:९सुमारे इ.स. ६५

    ही गोष्ट विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे.

  2. 1 तीमथ्य ४:१०सुमारे इ.स. ६५

    याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.

  3. 1 तीमथ्य ४:११सुमारे इ.स. ६५

    या गोष्टी आज्ञारूपाने सांग व शिकव.

  4. 1 तीमथ्य ४:१२सुमारे इ.स. ६५

    कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्‍यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो.

  5. 1 तीमथ्य ४:१३सुमारे इ.स. ६५

    मी तिथे येईपर्यंत सार्वजनिक शास्त्रवाचन करण्यात, बोध करण्यात, शिक्षण देण्यात तत्पर राहा.

  6. 1 तीमथ्य ४:१४सुमारे इ.स. ६५

    मंडळीच्या वडिलांनी तुझ्यावर हात ठेवले असता, संदेशाद्वारे जी आध्यात्मिक कृपादाने तुला दिली, त्याची उपेक्षा करू नको.

  7. 1 तीमथ्य ४:१५सुमारे इ.स. ६५

    तुझी प्रगती सर्वांच्या लक्षात येईल म्हणून या गोष्टींचे चिंतन कर, यामध्ये तत्पर राहा.

  8. 1 तीमथ्य ४:१६सुमारे इ.स. ६५

    तू आपले जीवन आणि शिक्षण यावर नीट लक्ष ठेव. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण करशील.

  9. 1 तीमथ्य ५:१सुमारे इ.स. ६५

    वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल.

  10. 1 तीमथ्य ५:२सुमारे इ.स. ६५

    वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे.

  11. 1 तीमथ्य ५:३सुमारे इ.स. ६५

    ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.

  12. 1 तीमथ्य ५:४सुमारे इ.स. ६५

    परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.

  13. 1 तीमथ्य ५:५सुमारे इ.स. ६५

    जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते.

  14. 1 तीमथ्य ५:६सुमारे इ.स. ६५

    परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.

  15. 1 तीमथ्य ५:७सुमारे इ.स. ६५

    त्यांनी निर्दोष असावे म्हणून या गोष्टी निक्षून सांग.

  16. 1 तीमथ्य ५:८सुमारे इ.स. ६५

    परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्‍यापेक्षा वाईट आहे.

  17. 1 तीमथ्य ५:९सुमारे इ.स. ६५

    जी विधवा साठ वर्षांपेक्षा अधिक आहे, तिच्या पतीबरोबर विश्वासू राहिलेली आहे,

  18. 1 तीमथ्य ५:१०सुमारे इ.स. ६५

    जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.

  19. 1 तीमथ्य ५:११सुमारे इ.स. ६५

    परंतु तरुण विधवांचे नाव अशा यादीत नोंदवू नये, कारण जेव्हा त्यांची विषयवासना ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेपेक्षा प्रबळ होते, तेव्हा त्या विवाह करू पाहतात,

  20. 1 तीमथ्य ५:१२सुमारे इ.स. ६५

    आणि म्हणून आपली पहिली प्रतिज्ञा मोडल्याबद्दल त्या आपल्यावर दंड ओढवून घेतात.

  21. 1 तीमथ्य ५:१३सुमारे इ.स. ६५

    शिवाय, त्या आळशी बनण्यात व घरोघर फिरून गप्पागोष्टी करण्यात आणि इतर लोकांच्या कामकाजात लुडबुड करण्यात आपला वेळ घालविण्याची शक्यता आहे.

  22. 1 तीमथ्य ५:१४सुमारे इ.स. ६५

    म्हणून माझी इच्छा आहे की तरुण विधवांनी विवाह करावा, मुलांना जन्म द्यावा व कुटुंब चालवावे; विरोध करणार्‍याला निंदा करण्याचे कोणतेही निमित्त सापडू नये.

  23. 1 तीमथ्य ५:१५सुमारे इ.स. ६५

    कारण असे करून काही विधवा यापूर्वीच मागे फिरून सैतानाच्या मागे गेल्या आहेत.

  24. 1 तीमथ्य ५:१६सुमारे इ.स. ६५

    जर कोणी विश्वासणारी स्त्री विधवांची काळजी घेत आहे, तर तिने त्यांची मदत करीत राहावे आणि मंडळीवर त्यांचे ओझे टाकू नये म्हणजे ज्या विधवा खरोखर गरजवंत आहेत, त्यांना मंडळी मदत करू शकेल.

  25. 1 तीमथ्य ५:१७सुमारे इ.स. ६५

    जे वडीलजन आपला अधिकार चांगल्या प्रकारे चालवितात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण याविषयी परिश्रम घेतात, त्यांना दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.