मुख्य मजकुरावर जा

Egypt

561 verses · 4 known names

हे नावानेही ओळखले जाते: Egyptian, Egyptians, Egyptian's

30.1000, 31.3300 गूगल नकाशावर पाहा

Egypt चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अशा रीतीने योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला. मग त्याच्या प्रेतात मसाला भरण्यात आला आणि ते एका शवपेटीत घालून इजिप्तमध्ये ठेवण्यात आले.

  2. याकोबाबरोबर इजिप्तला गेलेल्या इस्राएलचे पुत्र, जे आपल्या कुटुंबासह गेले, त्यांची नावे ही आहेत:

  3. याकोबाचे एकूण सत्तर वंशज होते; योसेफ तर आधीच इजिप्तमध्ये गेला होता.

  4. नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.

  5. इजिप्तच्या राजाने शिफ्राह व पुआह नावाच्या दोन इब्री सुइणींना अशी सूचना दिली की,

  6. पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले.

  7. तेव्हा इजिप्तच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही मुलांना का जिवंत राहू दिले?”

  8. सुइणींनी फारोह राजाला उत्तर दिले, “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांप्रमाणे नाहीत; त्या सशक्त आहेत आणि आम्ही तिथे पोहचण्या आधीच बाळंत होतात.”

  9. बराच काळ लोटल्यानंतर इजिप्तचा राजा मरण पावला. इस्राएली लोक क्लेशाने विव्हळत होते व आपल्या गुलामगिरीत रडून परमेश्वराचा धावा करीत होते; आणि त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतील त्यांचा धावा परमेश्वराकडे पोहोचला.

  10. नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे.

  11. तर आता जा, माझ्या इस्राएलच्या लोकांना इजिप्तमधून बाहेर काढून आणावे म्हणून मी तुला फारोहकडे पाठवित आहे.”

  12. पण मोशे परमेश्वराला म्हणाला, “मी कोण आहे की मी फारोहकडे जावे आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे?”

  13. परमेश्वराने म्हटले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला पाठविले आहे याचे चिन्ह हेच असणार: जेव्हा तू इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणशील, तेव्हा याच डोंगरावर तुम्ही परमेश्वराची उपासना कराल.”

  14. “जा आणि इस्राएलांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलव आणि त्यांना सांग, तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांचे परमेश्वर याहवेह हे मला प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्याकडे लक्ष दिले आहे आणि इजिप्तमध्ये तुमच्याबाबतीत जे काही घडत आहे ते मी पाहिले आहे.

  15. आणि इजिप्तमधील तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढून कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोक राहत असलेल्या दूध व मध वाहत्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याचे मी वचन दिलेले आहे.

  16. “इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे.

  17. पण मला माहीत आहे की, बलवान हाताने दबाव आणल्याशिवाय इजिप्तचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही.

  18. म्हणून मी आपला हात लांब करेन व माझ्या चमत्कारांनी इजिप्तवर प्रहार करेन. मग शेवटी तो तुम्हाला जाऊ देईल.

  19. “आणि या लोकांवर इजिप्तच्या लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करेन म्हणजे तुम्ही रिक्तहस्ते बाहेर पडणार नाही.

  20. इजिप्त देशातील स्त्रियांकडून व तुमच्या शेजारणीकडून प्रत्येक इस्राएली स्त्रीने सोन्याचे व चांदीचे दागिने व उत्तमोत्तम वस्त्रे मागून घ्यावीत व तुम्ही ते आपल्या मुलांवर व मुलींवर चढवावे, याप्रकारे तुम्ही इजिप्त देशातील लोकांना लुटाल.”

  21. मग मोशे आपला सासरा इथ्रोकडे गेला आणि त्याला म्हणाला, “इजिप्त देशात असलेल्या माझ्या स्वकियांकडे परत जाऊन त्यातील कोणी जिवंत आहेत की नाही ते मला पाहू दे.” इथ्रोने उत्तर दिले, “जा. तुझे भले होवो.”

  22. मिद्यानात याहवेहने मोशेला म्हटले, “इजिप्त देशास जा, कारण तुला ठार करावयास जे टपलेले होते, ते सर्व आता मरण पावले आहेत.”

  23. तेव्हा मोशे आपली पत्नी व मुले यांना गाढवावर बसवून इजिप्तला परतला. त्याने आपल्या हाती परमेश्वराची काठी घेतली.

  24. याहवेह मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात पोहोचल्यावर फारोहसमोर जाऊन, मी जे चमत्कार करण्याचे सामर्थ्य तुला दिले आहे, ते त्याच्यापुढे सादर कर. पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि तो लोकांना जाऊ देणार नाही.

  25. यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!”