मुख्य मजकुरावर जा

Egypt

561 verses · 4 known names

हे नावानेही ओळखले जाते: Egyptian, Egyptians, Egyptian's

30.1000, 31.3300 गूगल नकाशावर पाहा

Egypt चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली.

  2. गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले.

  3. गारांनी इजिप्त देशाच्या शेतातील सर्वकाही; मनुष्य असो वा जनावरे यांचा नाश केला; शेतात पिकत असलेले पीक व रानातील प्रत्येक झाड नाहीसे केले.

  4. फारोहचे अधिकारी त्याला म्हणाले, “किती काळ हा मनुष्य आम्हाला पाश म्हणून असणार? याहवेह त्यांचा परमेश्वर यांची उपासना करावी म्हणून या लोकांना जाऊ द्या. इजिप्तचा नाश झाला आहे याची तुम्हाला जाणीव नाही काय?”

  5. मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू आपला हात इजिप्त देशावर लांब कर म्हणजे टोळधाड येईल व गारांच्या वर्षावातून वाचलेली वनस्पती जी भूमीवर वाढत आहे त्या सर्वांचा ती नाश करेल.”

  6. तेव्हा मोशेने आपली काठी इजिप्त देशावर उगारली, आणि याहवेहने तो संपूर्ण दिवस व ती संपूर्ण रात्र पूर्वेचा वारा देशावर वाहविला. सकाळपर्यंत वार्‍याने टोळ आणले.

  7. त्यांनी संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला व ते मोठ्या संख्येने देशाच्या प्रत्येक भागात जाऊन राहिले. इतिहासात अशी भयंकर टोळांची पीडा ना कधी आली होती ना पुढे कधी येणार.

  8. कारण टोळांनी जमिनीचा पृष्ठभाग अगदी काळा होईपर्यंत झाकून टाकला व गारातून जे वाचले होते ते सर्वकाही—शेतातील सर्व पीक व झाडावरील प्रत्येक फळ त्यांनी फस्त केले. संपूर्ण इजिप्त देशात ना झाडे ना वनस्पती, काहीही हिरवे असे राहिले नाही.

  9. आणि याहवेहने पश्चिमेच्या दिशेने वार्‍याची दिशा बदलली व त्या वार्‍याने टोळांना एकवटून तांबड्या समुद्रात टाकले. इजिप्तमध्ये एकही टोळ शिल्लक राहिला नाही.

  10. नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.”

  11. तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला.

  12. मग याहवेह मोशेला म्हणाले, “मी फारोह व इजिप्तवर आणखी एक पीडा आणेन. त्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणाहून जाऊ देईल आणि जेव्हा तो हे करेल तेव्हा तो तुम्हाला अक्षरशः देशातून घालवून देईल.

  13. (आता याहवेहने इजिप्तमधील लोकांची मने इस्राएलांना अनुकूल होतील असे केले, मोशे स्वतः इजिप्तमध्ये फारोहच्या सेवकांच्या व इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीत फार थोर झाला होता.)

  14. मग मोशे म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मध्यरात्रीच्या सुमारास मी इजिप्तमधून फिरेन.

  15. इजिप्त देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र मरण पावेल, फारोह जो राजासनावर बसतो त्याच्या प्रथम पुत्रापासून त्याच्या जात्यावर दळत बसणार्‍या गुलाम स्त्रीच्या प्रथम पुत्रापर्यंत आणि जनावरातील प्रथम जन्मलेले प्रत्येक वत्स मरेल.

  16. संपूर्ण इजिप्त देशभर पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही असा आकांत होईल.

  17. परंतु इस्राएली व्यक्तीवर किंवा पशूंवर कुत्रेदेखील भुंकणार नाही.’ यावरून मी याहवेह इजिप्त व इस्राएल यांच्यामध्ये कसा भेद करतो, हे तुम्हाला समजेल.

  18. याहवेहने मोशेला आधीच सांगितले होते, “इजिप्त देशात मी पुष्कळ चमत्कार करावे म्हणून फारोह तुमचे ऐकण्यास नाकारेल.”

  19. मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले,

  20. “कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.

  21. तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही.

  22. “बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा.

  23. तेव्हा त्यांना सांगा, ‘हा याहवेहसाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, ज्यांनी इजिप्तच्या लोकांचा संहार करून त्यांचा नाश केला, आणि इस्राएली लोकांची घरे ओलांडून गेले आणि आम्हाला वाचविले.’ ” तेव्हा लोकांनी आपली मस्तके नमवून त्यांना नमन केले व त्यांची आराधना केली.

  24. मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्‍या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले.

  25. तेव्हा फारोह, त्याचे अधिकारी व सर्व इजिप्तचे लोक रात्री जागे झाले आणि इजिप्तमध्ये मोठा आकांत झाला, कारण ज्या घरात मृत्यू झाला नाही, असे एकही घर नव्हते.