मुख्य मजकुरावर जा

Egypt

561 verses · 4 known names

हे नावानेही ओळखले जाते: Egyptian, Egyptians, Egyptian's

30.1000, 31.3300 गूगल नकाशावर पाहा

Egypt चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएली लोक देशाबाहेर त्वरेने जावे म्हणून इजिप्तच्या लोकांनी त्यांना विनंती केली. कारण ते म्हणाले, “नाहीतर आम्ही सर्व मरून जाऊ!”

  2. जी कणीक इस्राएल लोकांनी इजिप्तमधून बरोबर आणली होती, त्याच्या त्यांनी भाकरी भाजल्या. ते कणीक बेखमीर होते, कारण जेव्हा त्यांना इजिप्तमधून घालवून दिले, स्वतःसाठी अन्न तयार करावयाला वेळ नव्हता.

  3. इस्राएली लोक इजिप्तमध्ये राहिले तो कालावधी चारशेतीस वर्षांचा होता.

  4. चारशेतिसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी याहवेहच्या सैन्यांनी इजिप्त देश सोडला.

  5. ही रात्र याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणण्यासाठी वेगळी करून ठेवली, ही रात्र इस्राएल लोकांनी पिढ्यान् पिढ्या याहवेहला सन्मान म्हणून पाळावी.

  6. याच दिवशी याहवेहने वंशानुसार इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले.

  7. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा दिवस स्मरणात ठेवा, याच दिवशी याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने इजिप्त देशातून, गुलामगिरीतून तुम्हाला बाहेर आणले. खमीर असलेले तुम्ही काहीही खाऊ नये.

  8. त्या दिवशी आपल्या लेकरांना सांगा, जेव्हा आम्ही इजिप्तमधून बाहेर आलो तेव्हा याहवेहने आमच्यासाठी जे केले, त्याचे चिन्ह म्हणून आम्ही हे करतो.

  9. हे तुम्हाला तुमच्या हातावरील खूण व कपाळावर स्मरणचिन्हासारखे असणार. याहवेहचा हा नियम तुमच्या मुखात असावा. कारण याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.

  10. “भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले.

  11. जेव्हा फारोह हट्टाने आम्हाला जाऊ देत नव्हता, तेव्हा याहवेहने संपूर्ण इजिप्त देशातील लोकांचे व जनावरांचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. म्हणून प्रत्येक उदरातून प्रथम जन्मलेला नर आम्ही याहवेहला समर्पित करतो आणि ते आम्ही खंडणी भरून सोडवितो.’

  12. आणि हे तुमच्या हातावर खूण व कपाळावर चिन्ह असे असावे, की याहवेहने आपल्या बलवान हाताने आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.”

  13. शेवटी फारोहने जेव्हा लोकांस जाऊ दिले, तेव्हा परमेश्वराने त्यांना पलिष्ट्यांच्या देशातून जवळचा मार्ग असूनही तिथून चालविले नाही. कारण परमेश्वर म्हणाले, “जर युद्धाला सामोरे जावे लागले तर त्यांचे मन बदलेल व ते पुन्हा इजिप्तकडे जातील.”

  14. म्हणून परमेश्वराने त्यांना तांबड्या समुद्राकडून रानाच्या मार्गाने नेले. इस्राएली लोक लढाईसाठी सज्ज होऊन इजिप्तमधून बाहेर पडले.

  15. जेव्हा इजिप्तच्या राजाला सांगितले गेले की ते लोक पळून गेले, फारोहने व त्याच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याविषयी आपले मन बदलले व ते म्हणाले, “आपण हे काय केले? आपण इस्राएली लोकांना जाऊ दिले व त्यांची सेवा गमावली!”

  16. सहाशे सर्वात उत्तम असे रथ व त्याबरोबर इजिप्तचे बाकी सर्व रथ व त्यावरील अधिकारी त्याने घेतले.

  17. याहवेहने इजिप्तचा राजा फारोह याचे हृदय कठीण केले म्हणून इस्राएली लोक जे मोठ्या धैर्याने इजिप्तमधून जात होते, त्यांचा त्याने पाठलाग केला.

  18. इजिप्तच्या लोकांनी—फारोहचे सर्व घोडे व रथ, घोडेस्वार व सैन्य यांच्यासह—इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि बआल-सफोनासमोर असलेल्या पी-हाहीरोथ, जिथे ते तळ देऊन होते तिथे त्यांना गाठले.

  19. ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?

  20. आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!”

  21. आणि इजिप्तचे सैन्य व इस्राएली लोक यांच्यामध्ये आला. त्या रात्रभर मेघांनी एका बाजूने प्रकाश तर दुसर्‍या बाजूने अंधकार आणला; म्हणून रात्रभर एक दल दुसर्‍यापर्यंत पोहोचला नाही.

  22. पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.

  23. इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला.

  24. इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.”

  25. मग मोशे व अहरोन यांनी सर्व इस्राएली लोकांना सांगितले, “संध्याकाळच्या वेळी तुम्हाला समजेल की याहवेहनेच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.