मुख्य मजकुरावर जा

Judah

244 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Judas, Juda

Judah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, ज्याचे जे आहे तो येईपर्यंत, राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.

  2. रऊबेन, शिमओन, लेवी आणि यहूदाह;

  3. “पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे.

  4. मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे,

  5. याहवेहने मोशेला जे सर्व आज्ञापिले होते ते यहूदाह वंशातील हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने तयार केले;

  6. यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;

  7. यहूदाहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  8. यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.

  9. पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेने: यहूदाहच्या छावणीच्या दलांनी त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. यहूदाहच्या लोकांचा पुढारी अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा.

  10. यहूदाहच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार, संख्येने 1,86,400 होते. त्यांनी सर्वप्रथम निघावे.

  11. पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.

  12. यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता.

  13. यहूदाह गोत्रातील यफुन्नेहचा पुत्र कालेब;

  14. एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.

  15. यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.

  16. ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.

  17. “ही त्यांची नावे आहेत: “यहूदाहच्या गोत्रातून, यफुन्नेहचा पुत्र कालेब;

  18. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  19. आणि तो यहूदाहबद्दल असे म्हणाला: “हे याहवेह, यहूदाहचा धावा ऐका; आणि त्याला आपल्या लोकांजवळ आणा. स्वतःच्या हाताने ते त्याचे संरक्षण करतात, तुम्हीच त्याच्यासाठी त्याच्या शत्रूविरुद्ध साहाय्य व्हा!”

  20. नफतालीचा संपूर्ण प्रदेश, एफ्राईम आणि मनश्शेह यांचे प्रदेश, त्यांच्या पलीकडे भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेला तो यहूदीयाचा सर्व प्रदेश,

  21. परंतु इस्राएली लोक समर्पित केलेल्या वस्तूंबाबतीत अविश्वासू होते; यहूदाह गोत्रातील जेरहाचा पुत्र जब्दी याचा पुत्र कर्मी, याचा पुत्र आखानाने त्यातील काही वस्तू घेतल्यामुळे याहवेहचा क्रोध इस्राएल राष्ट्राविरुद्ध भडकला.

  22. दुसर्‍या दिवशी सकाळ होताच यहोशुआने इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार पुढे बोलाविले आणि यहूदाहचे गोत्र निवडण्यात आले.

  23. यहूदाहचे गोत्र पुढे आले आणि जेरहाचे कूळ निवडण्यात आले. त्याच्या कुळातील प्रत्येक कुटुंब पुढे आले आणि जब्दीचे घराणे निवडले गेले.

  24. मग जब्दीच्या घराण्यातील एकाएका पुरुषाला समोर आणण्यात आले आणि यहूदाहच्या वंशातील जेरहाचा पुत्र जब्दीचा पुत्र कर्मीचा पुत्र आखान निवडला गेला.

  25. या काळामध्ये हेब्रोन, दबीर व अनाब येथील आणि यहूदीया व इस्राएलच्या सर्व डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अनाकाच्या सर्व वंशजांचा यहोशुआने सर्वस्वी नायनाट केला आणि त्यांची शहरे संपूर्णपणे ओसाड केली.