मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत: ‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ” अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले.

  2. नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील.

  3. नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन.

  4. “एकत्र व्हा आणि माझे ऐका, अहो याकोबाच्या पुत्रांनो; तुमचा पिता इस्राएल याचे ऐका.

  5. त्यांचा क्रोध शापित असो, आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे! मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन, आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन.

  6. “दान आपल्या लोकांना न्यायदान करेल, इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल.

  7. परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.

  8. हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला.

  9. आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला.

  10. नंतर योसेफाने वैद्यास त्याचा पिता इस्राएल याच्या मृतदेहात मसाला भरण्याची आज्ञा दिली. मग वैद्यांनी मृतदेहात सुगंधी द्रव्याचा मसाला भरला.

  11. नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, “लवकरच माझा अंत होईल, पण खात्रीने परमेश्वर तुमची भेट घेतील आणि तुम्हाला इजिप्त देशाबाहेर अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जातील,”

  12. नंतर योसेफाने इस्राएली लोकांना शपथ देऊन म्हटले, “परमेश्वर तुमच्या मदतीला येतील आणि मग तुम्ही निश्चितच माझ्या अस्थी या जागेवरून घेऊन जाल.”

  13. याकोबाबरोबर इजिप्तला गेलेल्या इस्राएलचे पुत्र, जे आपल्या कुटुंबासह गेले, त्यांची नावे ही आहेत:

  14. याकोबाचे एकूण सत्तर वंशज होते; योसेफ तर आधीच इजिप्तमध्ये गेला होता.

  15. परंतु इस्राएली लोक अत्यंत फलद्रूप झाले; ते बहुगुणित होऊन त्यांना पुष्कळ संतती झाली आणि त्यांची संख्या वाढून, लवकरच ते इतके असंख्य झाले की संपूर्ण देश त्यांनी व्यापून टाकला.

  16. त्याने आपल्या लोकांना सांगितले, “पाहा, इस्राएली लोक संख्येने आपल्यापेक्षा जास्त आहेत.

  17. परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.

  18. इजिप्तचे लोक इस्राएली लोकांकडून कठोरपणे कष्ट करून घेऊ लागले.

  19. बराच काळ लोटल्यानंतर इजिप्तचा राजा मरण पावला. इस्राएली लोक क्लेशाने विव्हळत होते व आपल्या गुलामगिरीत रडून परमेश्वराचा धावा करीत होते; आणि त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतील त्यांचा धावा परमेश्वराकडे पोहोचला.

  20. परमेश्वराने त्यांचे रडणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी त्यांनी केलेल्या कराराचे त्यांना स्मरण झाले.

  21. परमेश्वराने इस्राएली लोकांना पाहिले आणि त्यांना त्यांची आस्था वाटली.

  22. मग ते म्हणाले, “मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे, म्हणजे मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण परमेश्वराकडे पाहण्यास तो घाबरला.

  23. आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे.

  24. तर आता जा, माझ्या इस्राएलच्या लोकांना इजिप्तमधून बाहेर काढून आणावे म्हणून मी तुला फारोहकडे पाठवित आहे.”

  25. पण मोशे परमेश्वराला म्हणाला, “मी कोण आहे की मी फारोहकडे जावे आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे?”