मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु मोशेने परमेश्वराला विचारले, “जर मी इस्राएली लोकांकडे गेलो आणि त्यांना सांगितले, तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने मला पाठविले आहे, तर ते मला विचारतील, त्यांचे नाव काय आहे? तर मी त्यांना काय सांगू?”

  2. परमेश्वर मोशेला म्हणाले, “जो मी आहे तो मी आहे. इस्राएली लोकांना सांग: ‘मी आहे’ यांनी मला पाठवले आहे.”

  3. परमेश्वर मोशेला आणखी म्हणाले, “इस्राएलास सांग, ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर या तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ “हेच माझे सनातन नाव आहे, आणि सर्व पिढ्यांपर्यंत याच नावाने तुम्ही मला हाक मारणार.

  4. “जा आणि इस्राएलांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलव आणि त्यांना सांग, तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांचे परमेश्वर याहवेह हे मला प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्याकडे लक्ष दिले आहे आणि इजिप्तमध्ये तुमच्याबाबतीत जे काही घडत आहे ते मी पाहिले आहे.

  5. “इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे.

  6. याहवेहने मोशेला सांगितले “हे अशासाठी की याहवेह त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर—अब्राहामाचे परमेश्वर, इसहाकाचे परमेश्वर आणि याकोबाचे परमेश्वर—यांचे तुला निश्चितच दर्शन झाले आहे.”

  7. मग तू फारोहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल माझा ज्येष्ठपुत्र आहे,

  8. मग मोशे व अहरोन यांनी इस्राएलांच्या सर्व वडिलांना एकत्र बोलाविले,

  9. तेव्हा या गोष्‍टीवर त्यांनी विश्वास केला. आणि जेव्हा त्यांनी हे ऐकले की याहवेहने इस्राएली लोकांची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे, तेव्हा सर्वांनी नमन करून उपासना केली.

  10. नंतर मोशे व अहरोन फारोहकडे जाऊन त्याला म्हणाले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की रानात जाऊन त्यांनी माझा उत्सव साजरा करावा.’ ”

  11. यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”

  12. फारोहच्या मुकादमांनी इस्राएली गटांवर नेमलेल्या पुढार्‍यांना मार देऊन विचारले, “पूर्वीप्रमाणे, काल व आज तुम्हाला नेमून दिलेले विटा तयार करण्याचे काम तुम्ही का पूर्ण केले नाही?”

  13. तेव्हा इस्राएलांचे पुढारी फारोहकडे जाऊन त्याला विनवून म्हणाले, “तुम्ही आपल्या सेवकांशी असे निष्ठुरपणे का वागता?

  14. “तुम्हाला नेमून दिल्याप्रमाणे रोजचे विटा बनविण्याचे काम कमी केले जाणार नाही,” असे ऐकल्यावर आपण अडचणीत सापडलो आहोत, असे इस्राएली पुढाऱ्यांच्या लक्षात आले.

  15. मी सर्वसमर्थ परमेश्वर म्हणून अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रकट झालो होतो, परंतु माझ्या याहवेह या नावाने मी स्वतःची त्यांना ओळख करून दिली नव्हती.

  16. आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे.

  17. म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन.

  18. आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.”

  19. तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, परंतु त्यांची निराशा व कठोर परिश्रम यामुळे त्यांनी त्याचे ऐकले नाही.

  20. “जा, इजिप्तचा राजा फारोह याला सांग की, इस्राएल लोकांस त्याच्या देशातून त्याने जाऊ द्यावे.”

  21. परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?”

  22. आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.

  23. त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही: इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र: हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  24. ज्या अहरोन व मोशे यांना याहवेहने सांगितले होते, “इजिप्तच्या भूमीतून सर्व इस्राएलच्या लोकांना त्यांच्या तुकडीनुसार बाहेर आणा.”

  25. हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले.