मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राहेलने योसेफास जन्म दिल्यानंतर याकोब लाबानास म्हणाला, “माझी रवानगी करा म्हणजे मी माझ्या देशाला जाईन.

  2. “मी तुला काय देऊ?” त्याने विचारले. “मला काहीही देऊ नका,” याकोबने उत्तर दिले. “पण जर तुम्ही माझ्यासाठी हे केले तर मी तुमच्या कळपांचे पालन करेन आणि त्यांचा सांभाळ करेन:

  3. नंतर त्याने त्यांच्यामध्ये आणि याकोबामध्ये तीन दिवसांच्या यात्रेचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उर्वरित कळप राखू लागला.

  4. मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या.

  5. मग याकोबाने तरुण कळप बाजूला केला, परंतु लाबानाच्या कळपामधील पट्टेदार आणि गडद रंगाच्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. अशा प्रकारे त्याने स्वतःसाठी वेगळे कळप बनविले आणि त्यांना लाबानाच्या प्राण्यांबरोबर ठेवले नाही.

  6. जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी.

  7. पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत.

  8. याकोबाने लाबानाच्या पुत्रांचे म्हणणे ऐकले, “आमच्या वडिलांचे जे सर्वकाही होते ते याकोबाने घेतले आहे आणि ही सर्व संपत्ती त्याला जी मिळाली आहे ती आमच्या वडिलांची होती.”

  9. आणि याकोबाला दिसून आले की लाबानची त्याच्याबद्दलची वृत्ती आता पूर्वीसारखी राहिली नाही.

  10. तेव्हा याहवेह याकोबाशी बोलले आणि म्हणाले, “तू आता आपल्या वडिलांच्या व नातलगांच्या देशात परत जा आणि मी तुझ्याबरोबर असेन.”

  11. तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना ज्या शेतात तो कळप राखीत होता तिथे बोलावून घेतले.

  12. मग स्वप्नामध्ये परमेश्वराच्या दूताने मला बोलावून म्हटले, ‘याकोबा,’ मी उत्तर दिले, ‘हा मी इथे आहे.’

  13. मग याकोबाने आपल्या पत्नी व मुलांना उंटांवर बसविले

  14. याकोब अरामी लाबानाला काहीही न सांगता त्याला फसवून पळाला.

  15. याकोब पळून गेला आहे, हे लाबानाला तिसर्‍या दिवशी सांगण्यात आले.

  16. पण रात्रीच्या स्वप्नात परमेश्वर अरामी लाबानकडे आले आणि म्हणाले, “सावध राहा, तू याकोबाला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.”

  17. लाबानाने याकोबास गाठले तेव्हा याकोब गिलआद डोंगरमाथ्यावर तळ देऊन राहिला होता. मध्यंतरीच्या काळात लाबानानेदेखील आपला तळ डोंगराच्या पायथ्याशी दिला.

  18. लाबानाने याकोबाला विचारले, “हे तू काय केलेस? तू मला फसविले आणि माझ्या मुली युद्धबंदिसारख्या पळवून नेत आहेस?

  19. मी तुझे नुकसान करू शकलो असतो, पण तुझ्या पूर्वजांचे परमेश्वर काल रात्री मला म्हणाले, ‘सावध राहा, तू याकोबला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.’

  20. याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल.

  21. पण ज्याच्याकडून तुम्हाला तुमची कुलदैवते मिळतील, तो जिवंत राहणार नाही. आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, माझ्याबरोबर येथे तुमचे काही आहे की नाही ते स्वतःच पाहा; आणि असल्यास, ते घ्या.” राहेलने त्या मूर्ती चोरल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते.

  22. लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला.

  23. तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात?

  24. यावर लाबानाने याकोबास उत्तर दिले, “या स्त्रिया माझ्या मुली आहेत; ही मुलेबाळेही माझी आहेत; हे कळप व तुझे जे आहे ते सर्व माझेच आहे. तेव्हा माझ्या कन्या व त्यांची संतती यांचे मी आता करू?

  25. तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला;