मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता लेवीचे कुटुंबप्रमुख कनानातील शिलोहमध्ये असताना एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या इतर गोत्राच्या कुटुंब प्रमुखांकडे आले

  2. तेव्हा याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे, इस्राएली लोकांनी स्वतःच्या वतनभागातून लेवी लोकांना नगरे आणि कुरणे दिली, ती ही:

  3. याहवेहने मोशेद्वारे जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी चिठ्ठ्या टाकून लेवी लोकांना नगरे व त्यांची कुरणे नेमून दिली.

  4. इस्राएली लोकांच्या हद्दीत लेवी लोकांची सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची कुरणे होती.

  5. तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.

  6. आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले,

  7. तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले.

  8. म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.

  9. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”

  10. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.

  11. तेव्हा वृत्तांत ऐकून इस्राएली लोक आनंदित झाले व परमेश्वराची स्तुती केली आणि रऊबेनी व गाद लोकांशी लढण्याची किंवा ते राहतात त्या देशाचा नाश करण्याविषयी ते पुन्हा बोलले नाही.

  12. आणि इसहाकाला याकोब आणि एसाव हे दिले. एसावाला मी सेईरचा डोंगराळ प्रदेश वतन करून दिला, परंतु याकोब आणि त्याचे कुटुंब इजिप्त देशास गेले.

  13. योसेफाच्या ज्या अस्थी इस्राएली लोकांनी इजिप्त येथून आणल्या होत्या, त्या शेखेम येथे जी जागा याकोबाने हमोराच्या पुत्रांकडून चांदीच्या शंभर नाण्यांस विकत घेतलेली होती तिथे पुरल्या. हे योसेफाच्या वंशजांचे वतन झाले.

  14. यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले, “कनानी लोकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी प्रथम कोणी जावे?”

  15. जेव्हा याहवेहचा दूत या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, ते लोक मोठ्याने रडू लागले,

  16. नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले.

  17. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि बआल देवतांची सेवा केली.

  18. (हे केवळ यासाठी की ज्यांना युद्धाचा पूर्वी कोणताही अनुभव नव्हता, त्या इस्राएली लोकांच्या वंशजांना हा अनुभव यावा):

  19. इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले.

  20. इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले.

  21. याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला म्हणून त्यांनी, जिथे इस्राएली लोक आठ वर्षे गुलामगिरीत होते त्या अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईमच्या हाती त्यांना विकले.

  22. परंतु जेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहचा धावा केला, तेव्हा त्यांनी त्यांना सोडविण्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलला सुटका करणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.

  23. एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले.

  24. इस्राएली लोक अठरा वर्षे मोआबचा राजा एग्लोनचे गुलाम होते.

  25. इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले.