- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Israel
हे नावानेही ओळखले जाते: Jacob
Israel चा उल्लेख असलेली वचने
तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले.
(बिन्यामीन लोकांनी ऐकले की इस्राएली लोक वर मिस्पाह येथे गेले आहेत.) जेव्हा इस्राएली लोकांनी म्हटले, “आम्हाला सांग हे दुष्कर्म कसे घडले.”
तर आता इस्राएलांच्या सर्व लोकांनो, बोला आणि तुम्ही कोणता निर्णय घेतला ते मला सांगा.”
गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.” परंतु बिन्यामीन लोक आपल्या इस्राएली भाऊबंदाचे ऐकेनात.
बिन्यामीन वंशज आपल्या नगरातून येऊन ते गिबियाह येथे इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र झाले.
इस्राएली लोक वर बेथेल येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?” याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.”
इस्राएली लोक दुसर्या दिवशी उठले आणि त्यांनी गिबियाहजवळ तळ दिला.
इस्राएली लोक वर गेले आणि याहवेहपुढे संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी याहवेहला विचारले. ते म्हणाले, “आमचे बिन्यामीन भाऊबंद यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास आम्ही परत वर जावे का?” याहवेहने उत्तर दिले, “वर जाऊन हल्ला करा.”
दुसर्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीन लोकांवर हल्ला केला.
या वेळेस जेव्हा बिन्यामीन लोक त्यांच्या विरोध करण्यास गिबियाहतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी इस्राएली लोकांचे आणखी अठरा हजार पुरुष ठार केले, जे सर्व तलवारीने सशस्त्र होते.
मग संपूर्ण इस्राएली लोक, संपूर्ण सेना वर बेथेल येथे गेली आणि तिथे ते याहवेहसमोर रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि याहवेहला होमबली व शांत्यर्पणे अर्पिली.
आणि इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले. (त्या समयी परमेश्वराचा कराराचा कोश तिथे होता,
तिसर्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनच्या लोकांविरुद्ध युद्ध केले आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिबियाहजवळ व्यूहरचना केली.
मग बिन्यामीन लोक बोलू लागले, “आपण पहिल्याप्रमाणेच त्यांचा पराभव करीत आहोत!” परंतु इस्राएली लोक म्हणाले, “चला आपण पळण्यास सुरू करू आणि त्यांना शहरापासून दूर मार्गावर घेऊन येऊ.”
तेव्हा याहवेहने बिन्यामीनांचा इस्राएलपुढे पराभव केला आणि त्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनातील पंचवीस हजार शंभर लोक ठार केले, हे सर्व तलवारीने सशस्त्र होते.
नंतर इस्राएली लोकांनी हे विचारले, ते एकमेकास विचारू लागले, “इस्राएलाच्या सर्व गोत्रांमधून असा कोणी आहे, जो या सभेत याहवेहसमोर आला नाही?” कारण त्यांनी गंभीरतेने शपथ घेतली होती की, जो कोणी मिस्पाह येथे याहवेहसमोर उपस्थित राहणार नाही, त्याला अवश्य जिवे मारावे.
सर्व इस्राएली लोक त्यांचा बंधू बिन्यामीन गोत्राबद्दल दुःखी झाले. ते म्हणाले, “आज इस्राएलांच्या एका गोत्राचा उच्छेद झाला आहे.
आपण आपल्या कन्या त्यांना देऊ शकत नाही. कारण आपण इस्राएली लोकांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे: ‘जो कोणी बिन्यामीनास पत्नी करून देईल, तो शापित होईल.’
मग त्यावेळी इस्राएली लोकांनी ते स्थान सोडले आणि आपआपले गोत्र आणि कुळाप्रमाणे असलेल्या वतनात आपल्या घरी परतले.
माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.
त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्या अष्टारोथ व बआलांच्या मूर्ती टाकून दिल्या आणि केवळ याहवेहची सेवा केली.
जेव्हा ते मिस्पाह येथे एकत्र जमले, तेव्हा त्यांनी पाणी काढले व ते याहवेहसमोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास करून कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” त्यावेळी शमुवेल मिस्पाहमध्ये इस्राएलचा पुढारी म्हणून सेवा करीत होता.
इस्राएली लोक मिस्पाह येथे जमले आहेत, हे जेव्हा पलिष्ट्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले. हे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले.
इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून वाचवावे म्हणून आमच्यासाठी मध्यस्थी करावयाचे थांबवू नको.”
कीशला शौल नावाचा एक पुत्र होता, त्याच्यासारखा देखणा तरुण पुरुष इस्राएलमध्ये कोणीही नव्हता आणि तो सर्वांपेक्षा उंच होता.