मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता तू आणि हे सर्व लोक यार्देन नदी ओलांडून त्या देशात जाण्यास तयार व्हा, जो मी त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना देत आहे.

  2. तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”

  3. दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी शिट्टीम सोडले आणि ते यार्देन नदी पार करण्यापूर्वी त्यांनी काही दिवस तिथेच तळ दिला.

  4. मग यहोशुआने इस्राएली लोकांस म्हटले, “इकडे या व याहवेह तुमच्या परमेश्वराचे शब्द ऐका.

  5. तेव्हा यहोशुआने इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषास निवडले व त्यांना बोलाविले,

  6. आणि यहोशुआ त्यांना म्हणाला, “यार्देनेच्या मध्यभागी जिथे याहवेह तुमच्या परमेश्वराचा कोश आहे त्याच्यापुढे जा. तिथून तुमच्यातील प्रत्येकाने एक धोंडा खांद्यावर वाहून आणावा. इस्राएलच्या बारा गोत्रातील प्रत्येक गोत्रामागे एक, असे एकूण बारा धोंडे तुम्ही बारा जणांनी आणावे.

  7. तेव्हा तुम्हाला त्यांना सांगता येईल, याहवेहच्या कराराच्या कोशासमोर यार्देन नदीचा वाहता प्रवाह थांबला होता. जेव्हा त्यांनी यार्देन पार केली, तेव्हा यार्देन नदीच्या पाण्याचा प्रवाह दुभागला होता. हे धोंडे इस्राएली लोकांसाठी कायमचे स्मारक चिन्ह असावे.”

  8. तेव्हा इस्राएली लोकांनी यहोशुआने सांगितल्याप्रमाणे केले. याहवेहने यहोशुआला आज्ञापिल्यानुसार प्रत्येक गोत्रामागे एक याप्रमाणे बारा धोंडे त्यांनी यार्देन नदीच्या मध्यभागातून उचलले व ज्या ठिकाणी त्यांनी छावणी दिली, त्या ठिकाणी ते धोंडे ठेवले.

  9. मग मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र इस्राएली लोकांपुढे युद्धासाठी सुसज्ज होऊन पुढे निघाले.

  10. तो इस्राएली लोकांना म्हणाला, “भविष्यकाळात तुमचे वंशज त्यांच्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’

  11. आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.

  12. त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्‍या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.”

  13. तेव्हा यहोशुआने गारगोटीच्या सुर्‍या तयार केल्या आणि गिबियाथ हारालोथ या ठिकाणी इस्राएली लोकांची सुंता केली.

  14. इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही.

  15. यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला.

  16. त्यांनी त्या जमिनीतून उगविलेले धान्य खाल्ले त्याच्या दुसर्‍या दिवसापासून मान्ना मिळण्याचे थांबले; तिथून पुढे इस्राएली लोकांना कोणताही मान्ना मिळाला नाही, परंतु त्या वर्षी त्यांनी कनानमधील उपज खाल्ला.

  17. इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही.

  18. परंतु इस्राएली लोक समर्पित केलेल्या वस्तूंबाबतीत अविश्वासू होते; यहूदाह गोत्रातील जेरहाचा पुत्र जब्दी याचा पुत्र कर्मी, याचा पुत्र आखानाने त्यातील काही वस्तू घेतल्यामुळे याहवेहचा क्रोध इस्राएल राष्ट्राविरुद्ध भडकला.

  19. यामुळे इस्राएल त्यांच्या शत्रूपुढे उभे राहू शकत नाहीत; ते पाठ फिरवून पळून जात आहेत, कारण त्यांच्या नाशासाठी तेच जबाबदार आहेत. तुमच्यामधून नाशासाठी समर्पित असलेल्या वस्तूंचा तुम्ही नाश करेपर्यंत मी तुम्हाबरोबर असणार नाही.

  20. त्यांनी तंबूतून त्या सर्व वस्तू घेतल्या व यहोशुआ व सर्व इस्राएली लोकांकडे आणल्या आणि याहवेहसमोर पसरवून ठेवल्या.

  21. जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली.

  22. तिथेच इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआने मोशेच्या नियमशास्त्राची एक प्रत दगडांवर लिहिली.

  23. तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्‍या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे.

  24. परंतु इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, कारण मंडळीच्या पुढार्‍यांनी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने त्यांना तशी शपथ दिली होती. संपूर्ण सभेने पुढार्‍यांविरुद्ध कुरकुर केली,

  25. तेव्हा यहोशुआने त्यांना इस्राएली लोकांपासून वाचविले व त्यांना जिवे मारू दिले नाही.