मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्यावेळी इस्राएली लोकांनी इजिप्त देश सोडला, त्यांना मोशेने या अटी, विधी व नियम दिले

  2. आणि तेव्हा ते यार्देनेच्या पूर्वेकडे बेथ-पौर शहराजवळ तळ देऊन राहिलेले होते, हीच भूमी पूर्वी अमोर्‍यांनी आपला राजा सीहोनच्या अधिपत्याखाली व्यापली होती आणि त्याची राजधानी हेशबोन होती; मोशे व इस्राएली लोकांनी इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर सीहोन राजा आणि त्याच्या लोकांचा पराभव केला.

  3. जो देश देण्याचे वचन याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोबाला दिले होते, त्या देशात जेव्हा ते तुम्हाला घेऊन जातील व जी तुम्ही स्वतः वसविलेली नाहीत—अशी मोठी व सुंदर शहरे तुम्हाला देतील,

  4. तुम्ही नीतिमान आणि सरळ मनाचे लोक आहात म्हणून याहवेह तुम्हाला त्यांचा देश ताब्यात देतील असे मुळीच नाही; मी पुन्हा सांगतो की याहवेह तुमचे परमेश्वर हे केवळ त्या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच व त्यांनी तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जी शपथ दिली होती, ती पूर्ण करण्यासाठीच ते त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील.

  5. तुमचे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब यांची आठवण करा. या लोकांचा हट्टीपणा, त्यांच्या दुष्टपणाकडे व त्यांच्या पापाकडे लक्ष देऊ नका.

  6. (मग इस्राएली लोक बेने याकानच्या विहिरी सोडून प्रवास करीत मोसेरापर्यंत आले. तिथे अहरोन मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा पुत्र एलअज़ार त्याच्यानंतर याजक झाला.

  7. जर एखाद्याने आपल्याच इस्राएली बांधवाचे अपहरण केले आणि त्याला एखाद्या गुलामाप्रमाणे वागविले किंवा तो विकून टाकताना त्याला धरण्यात आले, तर अपहरण करणार्‍याला अवश्य जिवे मारावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्कर्म तुम्ही दूर करावे.

  8. याहवेहने मोआब देशात इस्राएली लोकांबरोबर जो करार करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्याच्या या अटी आहेत, त्यांनी होरेब पर्वतावर जो करार केला होता तो विस्तारित असा आहे.

  9. तुम्ही त्यांचे लोक आहात आणि तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रतिज्ञापूर्वक वचन दिल्याप्रमाणे याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत याची आज तुम्हाला खात्री करून द्यावयाची आहे.

  10. आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, त्यांची वाणी ऐकावी आणि त्यांना बिलगून राहावे. कारण याहवेहच तुमचे जीवन आहेत आणि अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या देशात तेच तुम्हाला दीर्घायुष्य देतील.

  11. “म्हणून आता हे गीत तुम्ही लिहून घ्या आणि ते इस्राएलाच्या सर्व लोकांना शिकव व त्यांना गावयास सांग, म्हणजे हे गीत त्यांच्याविरुद्ध माझ्याकरिता साक्ष असेल.

  12. तेव्हा त्याच दिवशी मोशेने त्या गीताचे शब्द लिहून काढले आणि सर्व इस्राएली लोकांना ते शिकविले.

  13. नंतर याहवेहने नूनाचा पुत्र यहोशुआला ही आज्ञा दिली: “खंबीर हो व हिंमत धर, कारण तू सर्व इस्राएली लोकांना मी त्यांना देऊ केलेल्या वचनदत्त देशात आणशील आणि मी स्वतः तुझ्याबरोबर असेन.”

  14. जेव्हा सर्वोच्चांनी पृथ्वीवरील राष्ट्रांना त्यांचे वतन दिले, तेव्हा त्यांनी सर्व मानवजातीची विभागणी केली, इस्राएलाच्या पुत्रांच्या संख्येनुसार त्यांच्या सीमारेषा आखून दिल्या.

  15. कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे.

  16. “तू मोआब देशात यरीहो पलीकडे असलेल्या अबारीम पर्वतातील नबो शिखराकडे जा, त्याच्यावर चढून समोर पसरलेला जो देश मी इस्राएली लोकांना त्यांचे स्वतःचे वतन म्हणून देणार आहे, त्या कनान देशाकडे नजर टाक.

  17. कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्‍याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही.

  18. तर तो देश तू दुरून पाहशील; पण मी जो देश इस्राएली लोकांना देणार आहे, त्यात तू प्रवेश करणार नाहीस.”

  19. परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.

  20. मोशेने आम्हाला जे नियम दिले, ते नियम याकोबाच्या सभेचे अमोल वतन आहे.

  21. ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील.

  22. म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्‍या भूमीत तो सुरक्षित राहील.

  23. मग याहवेह त्याला म्हणाले, “हाच तो वचनदत्त देश होय, ज्याचे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन देऊन मी म्हटले होते, ‘मी हा देश त्यांच्या वंशजांना देईन.’ आता त्याला तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेस, परंतु तू त्यात प्रवेश करणार नाहीस.”

  24. इस्राएली लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी विलाप करण्याचे तीस दिवस पूर्ण होईपर्यंत शोक केला.

  25. नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याजवर आपले हात ठेवले होते. म्हणून इस्राएली लोकांनी त्याचे ऐकले आणि याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा ते पाळीत असत.