मुख्य मजकुरावर जा

Woman बद्दल बायबलमधील वचने

193 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा इफ्ताह मिस्पाह येथे आपल्या घरी परतला, त्याची कन्या डफ वाजवित व आनंदाने नृत्य करीत त्याला भेटण्यास बाहेर आली! ती त्याची एकुलती एक कन्या होती, तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.

  2. परंतु माझी एक विनंती मान्य करा,” ती म्हणाली. “मला माझ्या सख्यांबरोबर दोन महिने डोंगरावर फिरू द्या आणि माझा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक करू द्या.”

  3. आणि लक्ष ठेवा. तुम्ही तिथे जा आणि शिलोहतील कन्या त्यांचे नृत्य करण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यातून धावत बाहेर निघा आणि तुम्ही प्रत्येकाने एकएका तरुणीला धरून आपली पत्नी करून घ्यावी. नंतर बिन्यामीनच्या भूमीत परत यावे.

  4. तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्‍या स्त्रियांबरोबर इथेच राहा.

  5. आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस.

  6. “याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.

  7. जसे ते डोंगर चढून त्या गावाकडे जात होते, त्यांना काही तरुणी भेटल्या ज्या पाणी काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या आणि त्यांनी त्यांना विचारले, “येथे कोणी संदेष्टा आहे काय?”

  8. दावीदाने पलिष्टी गल्याथाला ठार मारल्यानंतर ज्यावेळी लोक परत घरी येत होते, त्यावेळी इस्राएलच्या सर्व नगरांतून प्रत्येक गावातून स्त्रिया गात व नाचत आणि हर्षाने डफ व झांजा वाजवित शौल राजाला भेटायला आल्या.

  9. नाचत असताना त्यांनी गीत गाईले: “शौलाने त्याच्या हजारास वधले, दावीदाने त्याचे दहा हजार वधले.”

  10. आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते.

  11. योनाथान माझ्या भावा, मी तुझ्यासाठी शोक करतो; तू मला फार प्रिय होतास. माझ्यावरील तुझे प्रेम अद्भुत असे होते, स्त्रीच्या प्रेमापेक्षा ते अधिक अद्भुत होते!

  12. तेव्हा त्याच्या सेवकाने तिला बाहेर काढले आणि तिच्यामागे दार बंद केले. राजाच्या कुमारी कन्या घालत असत त्याप्रकारचा पायघोळ झगा तिने घातला होता.

  13. (अहाबासारखा कोणी कधीही झाला नाही, ज्याने आपली पत्नी ईजबेल हिच्या सांगण्यानुसार, याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले.

  14. हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” अलीशाने उत्तर दिले, “कारण मला माहीत आहे की तू इस्राएली लोकांचे वाईट करणार आहेस, तू त्यांच्या तटबंदीच्या ठिकाणास आग लावशील, त्यांच्या तरुण पुरुषांना तलवारीने ठार मारशील, त्यांच्या बालकांना आपटून मारशील आणि गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.”

  15. (हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)

  16. हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.

  17. याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी व 200 गायक व गायिका होत्या.

  18. याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी आणि 245 गायक व गायिका होत्या.

  19. शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले.

  20. एस्तेरला पाहून अंतःपुराचा अधिकारी हेगाइची कृपादृष्टी तिच्यावर झाली; आणि लगेचच तिच्यासाठी त्याने सौंदर्यप्रसाधनांची व खास भोजनपदार्थांची व्यवस्था केली. राजवाड्यातील सात दासी तिच्या तैनातीला त्याने दिल्या व तिला त्यांच्यासह अंतःपुरातील सर्वात उत्तम दालनात हालविले.

  21. एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे.

  22. राजकन्या, आपल्या अंतःपुरात तेजस्वी आहे; तिची भरजरी वस्त्रे सोन्याच्या धाग्यांनी विणलेली आहे.

  23. नक्षीदार वस्त्रांनी नटवून तुला राजाकडे नेण्यात येत आहे; तिच्या कुमारी सख्या तिच्या मागोमाग चालल्या आहेत— त्यांना तुझ्याकडे आणण्यात येत आहे.

  24. त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले; त्यांच्या कन्यांना विवाहगीते लाभलीच नाही.

  25. तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.