मुख्य मजकुरावर जा

Woman बद्दल बायबलमधील वचने

193 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.

  2. शाप देणारे हे पाणी तुझ्या शरीरात जावो, म्हणजे तुझे पोट फुगेल किंवा तुझा गर्भपात होईल.” “ ‘मग त्या स्त्रीने म्हणावे, “आमेन. असेच होवो.”

  3. “ ‘तेव्हा याजकाने हे शापाचे शब्द एका गुंडाळीवर लिहून ते शब्द त्या कडू पाण्यात धुवावे.

  4. ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल.

  5. याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे.

  6. त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे.

  7. जर ती आपल्या पतीशी अविश्वासू राहून तिने स्वतःला भ्रष्ट केले असेल, तर त्याचा परिणाम असा असेल: जेव्हा तिला ते शाप आणि कडवट कष्ट आणणारे पाणी पाजले जाईल, ते तिच्या शरीरात जाईल, तिचे पोट फुगेल आणि तिचे उदर गर्भपात करेल आणि ती शापित होईल.

  8. पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील.

  9. “इस्राएली लोकांना सांग, एखादा मनुष्य मरण पावला व त्यांच्यामागे त्याला पुत्र नाही, तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे.

  10. “तिने नवस केल्यावर किंवा तिच्या ओठांनी अविचाराने शपथ उच्चारली व स्वतःला बांधील केल्यानंतर जर तिने विवाह केला

  11. आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील.

  12. पण त्याविषयी ऐकून जर तिच्या पतीने तिला मनाई केली, तर ज्या नवसाने व शपथेने तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे, ते तो रद्द करतो व याहवेह तिला क्षमा करतील.

  13. मोशेने त्यांना विचारले, “तुम्ही सर्व स्त्रियांना जिवंत राहू दिले काय?

  14. त्यांनीच बलामाच्या सल्ल्यानुसार पेओरच्या प्रकरणात इस्राएली लोकांना याहवेहशी अविश्वासूपणा करण्यास भाग पाडले आणि याहवेहच्या लोकांना पीडेने मारले.

  15. पण त्या शहरातील सर्व स्त्रिया, मुले, गुरे व सर्व संपत्ती तुम्ही स्वतःकरिता ठेवावी. ही संपत्ती जी याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूकडून तुम्हाला देतील तिचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करावा.

  16. ज्या कुमारिकेचा वाङ्निश्चय झालेला आहे, अशा कुमारिकेला जर एखाद्या नगरात एखाद्या पुरुषाने भ्रष्ट केले,

  17. तर त्या दोघांनाही नगराच्या वेशीच्या बाहेर घेऊन जावे आणि मरेपर्यंत धोंडमार करावा—त्या कुमारिकेला अशासाठी की नगरात असताना तिने मदतीसाठी आरडाओरडा केला नाही आणि त्या पुरुषाला अशासाठी की त्याने दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीला भ्रष्ट केले. अशा रीतीने तुमच्यामधून कलंक दूर करून शुद्ध करावे.

  18. परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्‍या पुरुषाला ठार मारावे.

  19. त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्‍यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे,

  20. कारण त्या पुरुषाने त्या एकट्या कुमारिकेला शेतात शोधून काढली आणि मदतीसाठी ती ओरडलीच असेल, परंतु ते ऐकण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.

  21. जर एखाद्या पुरुषाने जिचा वाङ्निश्चय झालेला नसेल, अशा कुमरिकेवर बलात्कार केला आणि ते करीत असताना तो आढळला,

  22. तर त्याने मुलीच्या वडिलांना पन्नास चांदीची नाणी दंड म्हणून दिली पाहिजेत आणि त्या कुमारिकेशी विवाह केला पाहिजे, कारण त्याने तिला भ्रष्ट केले. तो जिवंत असेपर्यंत तिला घटस्फोट देऊ शकत नाही.

  23. घराबाहेर शत्रूंची तलवार त्यांना निर्वंश करेल; आणि घराच्या आत ते भयाक्रान्त होतील. तरुण पुरुष व तरुण स्त्रिया, वृद्ध आणि बालके नाश पावतील.

  24. यहोशुआने संपूर्ण इस्राएली मंडळी, स्त्रिया आणि मुलेबाळे आणि जे परदेशीय त्यांच्यामध्ये राहत होते यांना, मोशेने दिलेल्या सर्व आज्ञातील वाचून दाखविण्यात आल्या, एकही शब्द न वाचता सोडला नाही.

  25. त्याने घाईने आपल्या शस्त्रवाहकास बोलावून आदेश दिला, “तुझी तलवार काढ आणि मला ठार कर, ‘एका स्त्रीने त्याला ठार केले, असे कोणीही म्हणू शकणार नाही.’ ” तेव्हा त्या तरुणाने त्याला आपल्या तलवारीने भोसकले आणि तो मरण पावला.