मुख्य मजकुरावर जा

Woman बद्दल बायबलमधील वचने: Punishment for seducing, when betrothed

5 वचने · 73 पैलू

Punishment for seducing, when betrothed बद्दल वचने

  1. ज्या कुमारिकेचा वाङ्निश्चय झालेला आहे, अशा कुमारिकेला जर एखाद्या नगरात एखाद्या पुरुषाने भ्रष्ट केले,

  2. तर त्या दोघांनाही नगराच्या वेशीच्या बाहेर घेऊन जावे आणि मरेपर्यंत धोंडमार करावा—त्या कुमारिकेला अशासाठी की नगरात असताना तिने मदतीसाठी आरडाओरडा केला नाही आणि त्या पुरुषाला अशासाठी की त्याने दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीला भ्रष्ट केले. अशा रीतीने तुमच्यामधून कलंक दूर करून शुद्ध करावे.

  3. परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्‍या पुरुषाला ठार मारावे.

  4. त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्‍यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे,

  5. कारण त्या पुरुषाने त्या एकट्या कुमारिकेला शेतात शोधून काढली आणि मदतीसाठी ती ओरडलीच असेल, परंतु ते ऐकण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.