मुख्य मजकुरावर जा

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो दोषरहित ठरेल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही तो दोषी ठरविण्यात आला आहे, कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवण्याचे नाकारले.

  2. निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती.

  3. दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते.

  4. परंतु मी तुम्हाला ओळखतो व मला चांगले माहीत आहे की तुमच्या हृदयात परमेश्वराची प्रीती नाही.

  5. त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे.

  6. तुम्ही तुमचा पिता सैतानापासून आहात आणि तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घात करणारा व सत्याला धरून न राहणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे.

  7. आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर पापी लोकांचे ऐकत नाही. तर जे कोणी परमेश्वर भक्त असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचेच ते ऐकतात.

  8. या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही.

  9. कारण तू कडूपणाने भरलेला आणि पापाचा दास आहेस असे मला दिसते.”

  10. “तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय?

  11. कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही.

  12. परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली.

  13. ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले

  14. आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या.

  15. याकरिता परमेश्वरानेही त्यांना हृदयाच्या पापी वासना व सर्वप्रकारच्या लैंगिक अशुद्धतेच्या अधीन होऊ दिले आणि त्यांनी आपल्या शरीराची आपसात मानहानी केली.

  16. परमेश्वराविषयीच्या सत्याची अदलाबदल त्यांनी खोटेपणाशी केली आणि उत्पन्नकर्त्या ऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहेत. आमेन.

  17. या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले.

  18. तसेच पुरुषही स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध सोडून एकमेकांविषयीच्या अभिलाषेने कामातुर होऊन, त्यांनी एकमेकांशी लज्जास्पद कर्मे केली, याचा परिणाम असा झाला की त्यांना त्यांच्या अपराधांची योग्य शिक्षा मिळाली.

  19. यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.

  20. सर्वप्रकारचा दुष्टपणा व वाईटपणा, लोभ आणि दुष्टता यांनी ते भरले. ते द्वेष, खुनशीपणा, कलह, खोटेपणा, कटुता आणि कुटाळकी यांनी ते भरून गेले.

  21. ते निंदक, परमेश्वराचा द्वेष करणारे, उद्धट, गर्विष्ठ आणि बढाईखोर, नव्या वाईट मार्गाचा विचार करणारे, आणि आईवडिलांची आज्ञा न मानणारे झाले;

  22. ते निर्बुद्धि, विश्वासघातकी, प्रीतिशून्य आणि दयाहीन असे झाले.

  23. अशा गोष्टी करणार्‍यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.

  24. जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.

  25. पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील.