Skip to content

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर हाग्गयने म्हटले, “ ‘तर हे लोक व हे राष्ट्र माझ्या नजरेत हे असेच आहे,’ याहवेह जाहीर करतात. ‘ते जे काही करतात व जी अर्पणे आणता ती अपवित्र असतात.

  2. त्यांनी आपली अंतःकरणे गारगोटीसारखी कठीण केली आणि सर्वसमर्थ याहवेहने आरंभीच्या संदेष्ट्यांना आपल्या आत्म्याने प्रेरित करून त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा किंवा वचने ऐकण्याचे त्यांनी नाकारले. म्हणूनच याहवेहला त्यांच्यावर अत्यंत क्रोध आला.

  3. “ ‘जेव्हा मी त्यांना हाक मारली, त्यांनी ऐकण्याचे नाकारले; म्हणून त्यांनी मला हाक मारली, की मी त्यांचे ऐकणार नाही, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  4. आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.

  5. जर इजिप्तच्या लोकांनी येण्याचे नाकारले तर त्यांना पर्जन्यवृष्टी मिळणार नाही. याहवेह त्यांच्यावर मरी पाठवतील, जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतात.

  6. म्हणून इजिप्त व इतर राष्ट्रे जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतील, त्या सर्वांना ही शिक्षा करण्यात येईल.

  7. “मग तुम्ही विनंती करता, परमेश्वरा आम्हावर दया करा. पण अशा प्रकारची अर्पणे हातात घेऊन येता, तर ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

  8. यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे.

  9. ज्याने अशी गोष्ट केली आहे, मग तो कोणीही असो, तो सर्वसमर्थ याहवेहस अर्पणे वाहत असेल तरीही याहवेह त्याला याकोबाच्या तंबूमधून काढून टाको.

  10. दुसरी गोष्ट तुम्ही ही करता: तुम्ही याहवेहच्या वेदीवर अश्रूंचा पूर वाहता. तुम्ही रडता व आक्रोश करता, कारण ते तुमच्या हातातील अर्पणांवर कृपादृष्टी टाकत नाहीत व प्रसन्नतेने त्यांचा स्वीकार करीत नाहीत.

  11. पण आता, आपण जे उद्धट ते धन्य असे म्हणू. कारण दुष्टाई करणाऱ्यांची निश्चितच भरभराट होते आणि ते परमेश्वराची परीक्षा पाहतात, तरी ते निर्दोष ठरतात.’ ”

  12. मग नीतिमान व दुष्ट माणसे, त्याचप्रमाणे परमेश्वराची सेवा करणारे व सेवा न करणारे यातील फरक तुम्हाला दिसून येईल.”

  13. अंधारात राहणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला; मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर प्रकाश उदय पावला आहे.”

  14. “माझे अनुयायी असल्यामुळे लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.

  15. तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांनी प्राचीन काळाच्या संदेष्ट्यांनाही असेच छळले होते.

  16. पण तुमचे डोळे दोषपूर्ण असले, तर तुमचे संपूर्ण शरीर अंधाराने भरून जाईल. म्हणून तुमच्यातील प्रकाशच जर अंधार असला, तर तो अंधार केवढा मोठा!

  17. मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आला आहे.

  18. ते म्हणाले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्वगोष्टी दाखल्याद्वारेच सांगण्यात येतील.

  19. जे अंधारात जगत आहेत, जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि, आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.”

  20. त्याच्याकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेल्या समुदायास योहान म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्‍या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?

  21. पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या. ‘आमचा पिता तर अब्राहाम आहे,’ असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे.

  22. कुर्‍हाड आधीच झाडांच्या मुळावर ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”

  23. मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात, दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात, तेव्हा तुम्ही धन्य.

  24. “त्या दिवशी आनंदाने उड्या मारा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांच्या पूर्वजांनीही संदेष्ट्यांना असेच वागविले होते.

  25. मानवपुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला आहे.”