- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Valleys बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आणि म्हणून त्या ठिकाणाचे नाव “बोखीम” असे ठेवले. तिथे त्यांनी याहवेहला यज्ञ अर्पण केले.
इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते; होय, इस्साखार बाराक सोबत, रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खोर्यामध्ये पाठविले अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.
गिदोनाने बाकीच्या इस्राएली लोकांना घरी पाठवून दिले, परंतु त्याच्याजवळ फक्त तीनशे लोकच ठेवले, ज्यांनी इतरांकडून अन्नसामुग्री व रणशिंगे घेतली. त्याच्या खाली खोर्यात मिद्यानी लोक आपल्या छावणीत होते.
जेव्हा तीनशे रणशिंगे फुंकली, याहवेहने छावणीतील संपूर्ण पुरुषांची तलवार त्यांच्याच साथीदारावर चालविली. सैन्य सरेराहनजीकच्या बेथ-शिट्टाहपर्यंत व टब्बाथा नजीकच्या आबेल-महोलाहच्या सीमेपर्यंत पळून गेले.
काही काळानंतर सोरेक खोर्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले.
यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला.
दुसरी बेथ-होरोनकडे आणि तिसरी रानासमोर असलेले सेबोईम खोर्याच्या सीमेकडे गेली.
शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले.
पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते.
ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”
याजकाने उत्तर दिले, “ज्या पलिष्टी गल्याथाला तू एलाहच्या खोर्यात ठार मारलेस त्याची तलवार येथे आहे; ती कापडात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवलेली आहे. तुला पाहिजे तर ती तू घे; त्या शिवाय दुसरी तलवार येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही; ती मला दे.”
इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईमच्या खोर्यात पसरले.
क्षार खोर्यातील अठरा हजार अरामी लोकांना मारून परत आल्यावर दावीदाचे नाव प्रसिद्ध झाले.
अबशालोमने आपल्या कारकिर्दीत राजाच्या खोर्यात स्वतःच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारला. कारण तो स्वतःशी म्हणाला, “माझे नाव पुढे चालविण्यासाठी मला पुत्र नाही.” म्हणून त्याने त्या स्तंभाला अबशालोमचे स्मारक असे नाव दिले होते. आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.
यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले.
राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.
त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू.
परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन.
कारण याहवेह असे म्हणतात: तुम्हाला वारा किंवा पाऊस दिसणार नाही, तरीही ही दरी पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमचे गुरे आणि इतर जनावरे ते पाणी पितील.
जेव्हा ते मोठ्या पहाटेस उठले तेव्हा सूर्य पाण्यावर तळपत होता. ते पाणी मोआबी लोकांना दुरून रक्तासारखे दिसू लागले.
ते म्हणाले, “हे रक्त आहे! त्या राजांनी एकमेकांसह युद्ध केले असेल आणि त्यांनी एकमेकांना ठार मारले असेल. तेव्हा आता, मोआब्यांनो चला, त्यांचे सर्वकाही लुटून आणू.”
इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र यहोआशच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह पंधरा वर्षे जगला.
कोणीही आपला पुत्र अथवा कन्या यांचा मोलख दैवताला अग्नीत होम करू नये म्हणून राजाने बेन हिन्नोम खोर्यातील तोफेत अशुद्ध केले.
मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. सेरायाह योआबाचा पिता होता, हा योआब गे-हाराशीम चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते.