Skip to content

Valleys बद्दल बायबलमधील वचने

83 वचने · 58 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘त्या दिवशी मी गोगला इस्राएलमध्ये मृतकांना पुरण्याचे एक ठिकाण देईन, जे समुद्राच्या पूर्वेकडे प्रवास करणार्‍यांच्या खोर्‍यामध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांची वाट अडविली जाईल, कारण गोग आणि त्याचे सर्व सैन्य तिथे पुरले जातील. म्हणून त्याला हामोन-गोगचे खोरे म्हटले जाईल.

  2. त्या दिवशी येज्रीलच्या खोर्‍यात मी इस्राएलचे धनुष्य मोडून टाकीन.”

  3. कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’

  4. मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेन आणि त्यांना खाली यहोशाफाट च्या खोऱ्यात आणेन. त्यांनी माझ्या वतनास, माझ्या इस्राएली लोकांशी जे केले त्याबद्दल मी त्यांची परीक्षा घेईन. कारण त्यांनी माझ्या लोकांना राष्ट्रांमध्ये विखुरले आहे आणि माझ्या देशाचे विभाजन केले आहे.

  5. निर्णयाच्या खोर्‍यात लोकांची गर्दीच गर्दी आहे! कारण निर्णयाच्या खोऱ्यात याहवेहचा दिवस येऊन ठेपला आहे.

  6. “त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल, आणि टेकड्यांवरून दूध वाहील; यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतील आणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तो शिट्टीमच्या खोर्‍यात पाणी पुरवेल.

  7. त्या दिवशी यरुशलेमातील आकांत इतका मोठा असेल, जसा मगिद्दोच्या खोर्‍यात ठार झालेल्या हदाद-रिम्मोनासाठी होता.

  8. प्रत्येक दरी भरून जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी समान होतील, वाकड्या वाटा सरळ होतील, खडतर रस्ते सुरळीत होतील.