- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Valleys बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आसाने त्याचा सामना करण्यासाठी आगेकूच केले आणि ते मारेशाहजवळ असलेल्या जेफथाह खोऱ्यात युद्धासाठी स्थानबद्ध झाले.
चौथ्या दिवशी ते बेराखाह खोऱ्यात एकत्र जमले, जिथे त्यांनी याहवेहला धन्यवाद दिला. म्हणून आजही त्या ठिकाणाला बेराखाहचे खोरे असे म्हणतात.
त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.
तरीसुद्धा, योशीयाह त्याच्यापासून मागे फिरला नाही, परंतु त्याला युद्धात गुंतवून ठेवण्यासाठी त्याने स्वतःचे वेषांतर केले. परमेश्वराच्या आज्ञेनुसार नखोने जे सांगितले, ते त्याने ऐकले नाही, परंतु तो मगिद्दोच्या मैदानावर त्याच्याबरोबर लढण्यासाठी गेला.
त्यांना कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये, खडकात आणि भूमीतील बिळांमध्ये राहावे लागले.
मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.
परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.
हिरवीगार कुरणे कळपांनी भरून जातात आणि दर्यांची भूमी धान्यांनी आच्छादली जाते; ती आनंदाने गजर करीत गाऊ लागते.
ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.
ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्याखोर्यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले.
त्यांनी खोर्यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले.
“आपल्या वडिलांचा चेष्टा करणारे डोळे, आणि वृद्ध आईचा तिरस्कार करणारे डोळे, दरीतील डोमकावळे टोची मारून बाहेर काढतील, त्यांची शरीरे गिधाडे खातील.
मी शारोनाचा गुलाब आहे, खोर्यातील कमळ आहे.
दर्याखोर्यात वाढत असलेली नवी झाडे, द्राक्षवेलींना आलेले अंकुर, आणि डाळिंबाला आलेली फुले पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो.
जेव्हा कापणी करणारे उभे पीक कापतात, आणि धान्य त्यांच्या हातात गोळा करतात— जसे जेव्हा कोणी रेफाईमच्या खोऱ्यात धान्याची कणसे गोळा करतात तसे होईल.
तुमची आवडती खोरी रथांनी भरून गेली आहेत, आणि घोडेस्वार नगराच्या फाटकांवर तैनात आहेत.
त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, त्या फिके पडणार्या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!
ते सुकत जाणारे फूल, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेले, त्याचे तेजस्वी सौंदर्य, कापणीच्या आधी पिकलेल्या अंजिरांसारखे होईल— लोक त्यांना पाहताक्षणीच त्यांना हातात घेतात, व त्यांना गिळंकृत करतात.
त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम, आणि त्यांचे कठीण कार्य, होय, त्यांचे अद्भुत कार्य सिद्ध करण्यासाठी, जसे ते पेराझीम पर्वतावर राहिले होते, तसे याहवेह उभे राहतील, जसे गिबोनच्या खोऱ्यामध्ये केले होते, तसे स्वतःला उभारतील.
प्रत्येक दरी उंच केली जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल; खडबडीत जमीन सपाट होईल, खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल.
ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन त्यांच्यासाठी दर्यात मी पाण्याचे झरे उफळवेन. मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील.
एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत तुम्ही कामांध होता; खोल दर्यात, खडकांच्या कड्याखाली नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता.
माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.
म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही.
आश्रयासाठी पळ काढणारे डोंगराकडे पळतील. खोर्यातील पारव्यांप्रमाणे, आपल्या स्वतःच्या पापाकरिता, ते सर्व शोक करतील.