Skip to content

The Wind बद्दल बायबलमधील वचने

73 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी आकाशातून पूर्वेचा वारा सोडला आणि त्यांच्या सामर्थ्याने दक्षिणेकडील वारा वाहू दिला.

  2. आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा, व आपल्या तुफानाने त्यांना घाबरवून सोडा.

  3. परंतु उष्ण वारा त्यावर येताच ते कायमचे नाहीसे होते, ते स्थळ त्याचे स्मरण करीत नाही.

  4. ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.

  5. त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले, आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.

  6. पृथ्वीच्या दिगंतापासून ते मेघ वर चढवितात; पर्जन्यवृष्टीसह ते विजा पाठवितात आणि आपल्या भांडारातून ते वारे प्रवाहित करतात.

  7. विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.

  8. कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो, तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे.

  9. जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते.

  10. वर स्वर्गात कोण चढून गेला आणि मग खाली उतरला आहे? वार्‍याला मुठीमध्ये धरलेला असा कोण आहे? अंगरख्यामध्ये कोणी पाणी बांधले आहे काय? पृथ्वीच्या सर्व सीमांची स्थापना कोणी केली आहे? त्याचे नाव काय आहे आणि त्याच्या पुत्राचे नाव काय आहे? तुम्हाला ते निश्चितच माहीत आहे!

  11. वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो; तो गोल गोल भ्रमण करीत आपल्या ठिकाणी परत जातो.

  12. उत्तरेच्या वार्‍या, जागा हो, आणि दक्षिणेच्या वार्‍या, ये; माझ्या बागेतील सुगंध चोहीकडे पसरावा, म्हणून माझ्या बागेवरून वाहत जा. माझ्या प्रियकराला त्याच्या बागेत येऊ द्या, आणि बागेतील सर्वोत्कृष्ट फळे खाऊ द्या.

  13. आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली.

  14. याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे आखात कोरडे करतील; होरपळणाऱ्या वाऱ्याने ते फरात नदीवर हात झटकून टाकतील. ते त्याचे सात ओढे पाडतील जेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल.

  15. आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो, परंतु आम्ही वार्‍याला जन्म दिला. आम्ही देशात तारण आणलेले नाही, आणि जगातील लोक जीवनाकडे आले नाहीत.

  16. रणनीती आणि बंदिवास करून तुम्ही तिच्याबरोबर वाद घालता— जसे एखाद्या दिवशी पूर्वेचा वारा वाहतो, तसे त्यांच्या हिंसक स्फोटाने ते तिला घालवून देतात.

  17. सर्वसमर्थ याहवेह येतील मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.

  18. गवत सुकते आणि फुले गळून पडतात, कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो. निश्चितच लोक गवत आहेत.

  19. तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल, आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल; मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल.

  20. पाहा, ती सर्व खोटी आहेत! त्यांची कामे व्यर्थ आहेत; त्यांच्या मूर्ती केवळ वायू असून, त्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत.

  21. आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत. आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत; आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो, वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात.

  22. त्यावेळी या लोकांना व यरुशलेमला सांगितल्या जाईल, “वाळवंटातील उजाड टेकड्यांवरून दाहक वारा माझ्या लोकांकडे येईल, परंतु पाखडणे किंवा स्वच्छ करण्यासाठी नाही.

  23. जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघगर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.

  24. म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल.

  25. “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या क्रोधाने तुफानी वारा सोडेन आणि माझ्या रागाने नाशाच्या संतापाने गारा व मुसळधार पाऊस पडेल.