मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Zebulun बद्दल बायबलमधील वचने

46 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ती सारीदपासून वळून पूर्वेकडे उगवतीला किसलोथ-ताबोर याच्या सीमेपर्यंत जाऊन पुढे दाबरथ आणि याफीयापर्यंत गेली.

  2. तिथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर आणि एथ-काझीनपर्यंत येते; व तिथून रिम्मोनकडे येऊन नेआहकडे वळते.

  3. तेथील सीमा उत्तरेच्या बाजूंनी हन्नाथोनकडे जाते आणि इफ्ताह-एल खोर्‍यापर्यंत जाऊन संपते.

  4. त्यात कट्टाथ, नहलाल, शिम्रोन, इदलाह आणि बेथलेहेम यांचा समावेश होता. ती बारा नगरे आणि त्यांची गावे होती.

  5. ही नगरे व त्यातील गावे जबुलून गोत्राच्या कुळानुसार वतन होती.

  6. जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले.

  7. बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली.

  8. ज्यांचे मूळ अमालेकामध्ये होते, ते काही लोक एफ्राईमामधून आले; बिन्यामीन तुम्हाला अनुसरण करणार्‍या लोकांसह होते. माखीराचे सरदारही आले, जबुलूनाचे दंडधारी सेनापतिसुद्धा आले.

  9. जबुलूनच्या लोकांनी आपल्या जीव धोक्यात घातला; तसेच नफतालीच्या लोकांनी रणभूमीवर मरणाचा धोका पत्करला.

  10. त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.

  11. त्याच्यानंतर एलोन जबुलूनने दहा वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

  12. मग एलोन मरण पावला आणि त्याला जबुलून देशातील अय्यालोनमध्ये पुरण्यात आले.

  13. जबुलून गोत्रातले निष्णात लढवय्ये 50,000, ते शस्त्रांनी सुसज्ज व दावीदाला एकनिष्ठ होते;

  14. जबुलून गोत्रावर: ओबद्याहचा पुत्र इश्मायाह; नफताली गोत्रावर: अज्रीएलचा पुत्र यरिमोथ;

  15. संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली.

  16. तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले.

  17. एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.

  18. तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—

  19. नासरेथ सोडल्यानंतर जबुलून व नफताली या प्रांताजवळ असलेल्या सरोवराच्या किनार्‍यावरील कफर्णहूम येथे गेले.

  20. या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे:

  21. “जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत, समुद्राच्या मार्गावरचा आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, गैरयहूदीयांचा गालील प्रांत—