मुख्य मजकुरावर जा

The Resurrection of Christ बद्दल बायबलमधील वचने

120 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु त्यांनी त्यांना आग्रह करून म्हटले, “आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली आहे.” तेव्हा येशू त्यांच्या घरी गेले.

  2. ते भोजनास बसले असताना, येशूंनी भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली आणि ती त्यांना दिली.

  3. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले.

  4. जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.”

  5. तेव्हा त्या दोघांनी सांगितले की, ते रस्त्याने असताना काय घडले होते आणि येशूंनी भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्यांना कसे ओळखले.

  6. आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले.

  7. येशूंनी त्यांना विचारले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात संशय का आला?

  8. माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.”

  9. त्यांनी तो घेऊन त्यांच्यादेखत खाल्ला.

  10. मग शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्यांनी त्यांची मने उघडली.

  11. त्यांनी पुढे म्हटले, “ख्रिस्ताने दुःख सहन करावे, मरावे आणि तिसर्‍या दिवशी मरणातून पुन्हा उठावे या गोष्टी फार पूर्वी लिहून ठेवल्या होत्या.

  12. येशू त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांना सोडून स्वर्गात वर घेतले गेले.

  13. येशू म्हणाले, “हे मंदिर तुम्ही नष्ट करा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.”

  14. त्यांनी उत्तर दिले, “हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि आपण तीन दिवसात हे बांधू शकता का?”

  15. परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते.

  16. पुढे ते मरणातून उठल्यानंतर, त्यांच्या शिष्यांना या शब्दाचे स्मरण झाले. नंतर त्यांनी शास्त्रलेख व येशूंनी उच्चारलेली वचने यावर विश्वास ठेवला.

  17. तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी स्वतः होऊनच तो अर्पण करतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.”

  18. कारण त्यांनी मेलेल्यातून पुन्हा उठावे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता.

  19. मरीया मग्दालिया, शिष्यांकडे बातमी घेऊन आली: “मी प्रभूला पाहिले आहे!” ज्यागोष्टी येशूंनी तिला सांगितल्या होत्या त्या तिने शिष्यांना सांगितल्या.

  20. आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असता, यहूदी पुढार्‍यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”

  21. असे बोलल्यावर, त्यांनी आपले हात व आपली कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना अतिशय आनंद झाला.

  22. येशू आले त्यावेळी बारा पैकी एकजण दिदुम म्हणजे जुळा या नावाने ओळखला जाणारा थोमा तिथे शिष्यांबरोबर नव्हता.

  23. एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”

  24. नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.”

  25. त्यानंतर येशू पुन्हा तिबिर्‍यास सरोवराजवळ शिष्यांस प्रगट झाले, ते असे घडले: