Skip to content

Tax बद्दल बायबलमधील वचने

51 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शलोमोनचा रोजचा पुरवठा तीस कोर सपीठ व साठ कोर पीठ,

  2. गोठ्यात चारलेले दहा बैल, कुरणात चरणारे वीस बैल आणि शंभर मेंढरे व बोकडे, याशिवाय हरिण, सांबरे, भेकरे आणि पुष्ट पक्षी.

  3. कारण फरात नदीच्या पश्चिमेकडील तिफसाहपासून गाझापर्यंतच्या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते आणि सर्व बाजूने शांती होती.

  4. शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते.

  5. शलोमोनकडे रथाच्या घोड्यांसाठी चार हजार तबेले आणि बारा हजार घोडे होते.

  6. जिल्हाधिकारी आपआपल्या महिन्यात शलोमोन राजाला व त्यांच्या मेजावर भोजन करणार्‍यांसाठी अन्नसामुग्रींचा पुरवठा करीत असत. कशाचीही वाण पडणार नाही याची ते दक्षता घेत असत.

  7. त्याचप्रमाणे रथाच्या घोड्यांसाठी व इतर घोड्यांसाठी देखील जव व वैरण त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी आणत असत.

  8. शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकाम, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे.

  9. अदोनिराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु सर्व इस्राएलने त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.

  10. तेव्हा अश्शूरचा राजा पूल ने देशावर हल्ला केला आणि मनाहेमने त्याचा पाठिंबा मिळावा आणि आपले राज्य स्थिर व्हावे यासाठी त्याला चांदीचे हजार तालांत दिले.

  11. मनाहेमाने हा पैसा इस्राएलमधून वसूल केला. अश्शूरच्या राजाला द्यायला प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने पन्नास चांदीचे शेकेल द्यायचे होते. मग अश्शूरचा राजा मागे फिरला आणि देशात राहिला नाही.

  12. यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले.

  13. हदोराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.

  14. मी अशीही आज्ञा देतो की याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरात काम करणारे आणि मंदिरातील इतर कामगार यांच्यापासून कुठलाही कर, जकात वा चुंगी घेण्याचा तुला अधिकार नाही.

  15. दुसरे म्हणाले, “दुष्काळापासून जीव वाचवावा म्हणून धान्य मिळविण्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागली आहेत.”

  16. आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत.

  17. “प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची;

  18. तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्‍या रमणीय जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.

  19. सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते.

  20. येशू व त्यांचे शिष्य कफर्णहूमात आल्यानंतर, दोन द्राह्मा मंदिर कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरुजी मंदिराचा कर भरीत नसतात काय?”

  21. “अर्थात् ते कर भरीत असतात,” पेत्राने उत्तर दिले. मग पेत्र घरात गेला, तेव्हा तो काही बोलण्या आधी येशूंनी त्याला विचारले, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीचे राजे कर कसे गोळा करतात; स्वतःच्या लेकरांकडून की इतर लोकांकडून?”

  22. “इतर लोकांकडून,” पेत्राने उत्तर दिले. “लेकरे कर भरण्यापासून मुक्त आहेत.” तेव्हा येशू म्हणाले

  23. “पण आपण अडखळण होऊ नये, म्हणून सरोवराच्या किनार्‍यावर जा व तुझा गळ टाक आणि प्रथम जो मासा धरशील त्या माशाचे तोंड उघड आणि त्यात तुला चार द्राह्माचे नाणे मिळेल. ते घे आणि माझ्यासाठी व तुझ्यासाठी कर भर.”

  24. त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.

  25. ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती.