Skip to content

Tax बद्दल बायबलमधील वचने: Poll

9 वचने · 10 पैलू

Poll बद्दल वचने

  1. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  2. “तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही.

  3. प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.

  4. जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे.

  5. जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये.

  6. इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”

  7. जनगणना झालेले वीस वर्ष व त्याहून अधिक वयाचे सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास पुरुष होते—त्याचा प्रत्येक पुरुषाकरिता एक बेका, म्हणजेच पवित्रस्थानाच्या वजनानुसार अर्धा शेकेल मिळाला होता.

  8. “प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची;

  9. त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.