Skip to content

Sin बद्दल बायबलमधील वचने

210 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.”

  2. जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले.

  3. पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली.

  4. सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली.

  5. आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.”

  6. त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.”

  7. तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?” त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.”

  8. नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले, “तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन; वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील, तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील, आणि तो तुजवर सत्ता गाजवील.”

  9. नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.

  10. भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, आणि तू शेतातील पीक खाशील.

  11. ज्यामधून तू घडविला गेलास त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत तू घाम गाळून अन्न खाशील, कारण तू माती आहेस आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.”

  12. आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले.

  13. पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले.

  14. तेव्हा याहवेह अर्पणाच्या सुगंधाने संतुष्ट झाले आणि आपल्या अंतःकरणात म्हणाले: “जरी लहानपणापासून मानवी हृदयाची प्रत्येक प्रवृत्ती वाईट आहे तरी मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा कधी शाप देणार नाही आणि जसा मी केला आहे, तसा सर्व जिवंत प्राण्यांचा नाश यापुढे कधीही करणार नाही.

  15. मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.”

  16. आणि त्याने ते वासरू घेतले जे लोकांनी घडविले होते व ते अग्नीत जाळून टाकले; मग त्याने त्याची कुटून बारीक पूड केली, ती पाण्यात विरघळून इस्राएलच्या लोकांना प्यायला दिली.

  17. अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामी, क्रोधित होऊ नको, तुला माहीत आहे की हे लोक कसे दुष्टतेकडे प्रवृत्त होतात.

  18. ते मला म्हणाले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.’

  19. म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘ज्यांच्याकडे सोन्याचे दागिने आहेत ते त्यांनी काढावे.’ मग त्यांनी ते सोने मला दिले, आणि मी ते अग्नीत टाकले, आणि त्यातून हे वासरू बाहेर आले.”

  20. हजारांवर प्रीती करणारे, दुष्टता, अपराध व पाप यांची क्षमा करणारे; तरीही याहवेह दोषीला निर्दोष असे सोडत नाहीत; तर आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततीवर, व त्यांच्या संततीच्या तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत देणारे आहे.”

  21. तो म्हणाला, “हे प्रभू, तुमच्या दृष्टीने मी जर कृपा पावलो असलो, तर प्रभूने आमच्याबरोबर जावे. जरी हे लोक ताठ मानेचे आहेत, तरी आमच्या दुष्टाईची व आमच्या पापाची क्षमा करून आपले वतन म्हणून आमचा स्वीकार करा.”

  22. “ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे.

  23. “परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार.

  24. तुम्ही त्या रानात याहवेह तुमच्या परमेश्वराला राग येईल असे वागलात, हे तुम्ही विसरू नका आणि याची नेहमी आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत, तुम्ही याहवेहविरुद्ध सतत बंड केले.

  25. कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्‍यांचा तिरस्कार करतात.