Skip to content

Sin बद्दल बायबलमधील वचने

210 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर आपण म्हणतो की, आपण पाप केले नाही, तर आपण परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्यांचे वचन आपल्यामध्ये नाही.

  2. जे प्रत्येकजण पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हेच पाप आहे.

  3. परंतु तुम्हाला हे माहीत आहे की, आपली पापे दूर करावी म्हणून ख्रिस्त प्रकट झाले. त्यांच्यामध्ये कोणतेही पाप नाही.

  4. जो कोणी पापमय गोष्टी करतो ते सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आला आहे. परंतु सैतानाची कृत्ये नष्ट करावी म्हणून परमेश्वराचे पुत्र प्रकट झाले.

  5. ज्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे, ते पाप करीत राहत नाही, कारण त्यांच्याठायी परमेश्वराचे बीज राहते; म्हणून पाप करीत राहणे त्याला अशक्यच असते, कारण त्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे.

  6. प्रत्येक चुकीचे कृत्य पाप आहे आणि असेही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही.

  7. आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही.

  8. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे, आणि परमेश्वराने तिच्या गुन्ह्याची आठवण केली आहे.

  9. तिने जसे तुम्हाला केले, तसेच तिला करा; तिने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तिला दुप्पट शिक्षा करा. तिच्या प्याल्यात तिच्याच प्याल्यातून दुप्पट ओता.”

  10. मात्र त्या नगरीत कोणतीही अपवित्र गोष्ट, लज्जास्पद किंवा असत्य आचरण करणाऱ्यांचा प्रवेश होणार नाही. परंतु ज्यांची नावे कोकर्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच या नगरीत प्रवेश करतील.