Skip to content

Shields बद्दल बायबलमधील वचने

36 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला: “अब्रामा, भिऊ नको; मीच तुझी ढाल, तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे.”

  2. परमेश्वराने नवीन पुढारी निवडले जेव्हा युद्ध शहराच्या वेशीजवळ आले होते, परंतु इस्राएलाच्या चाळीस हजारांमध्ये एकही ढाल किंवा भाला दिसला नाही.

  3. विणकर्‍याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते. त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला.

  4. “गिलबोआच्या डोंगरांनो, तुम्हावर दव किंवा पाऊस न येवो; तुमच्या उतरणीच्या शेतांवर पावसाच्या सरी न पडोत. कारण तिथे शूरवीराची ढाल तिरस्कृत झाली, शौलाची ढाल—यापुढे तेलाने पुसली जाणार नाही.

  5. हादादेजरच्या अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.

  6. माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.

  7. तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीन मीना सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या.

  8. म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती त्या स्वाधीन केल्या.

  9. रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रात 44,760 पुरुष योद्धे होते—ढालधारी, तलवारबहादूर, धनुर्धारी व युध्दकलानिपुण असे.

  10. गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.

  11. यहूदाह गोत्रातील ढाल व भाला धारण करणारे हत्यारबंद 6,800 योद्धे;

  12. नफतालीचे 1,000 अधिकारी आणि भाले व ढाली यांनी सुसज्ज असे 37,000 सैनिक;

  13. शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे फार मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल ठोकलेले सोने लागले होते.

  14. तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीनशे शेकेल सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या.

  15. त्याने तेथील प्रत्येक नगरात ढाली आणि भाले ठेवले आणि त्यांना फारच सामर्थ्यवान केले. म्हणून यहूदीया आणि बिन्यामीन त्याच्याकडेच राहिले.

  16. आसाकडे यहूदीयाचे तीन लाख योद्ध्यांचे सैन्य, मोठ्या ढाली आणि भाले घेऊन सुसज्ज होते आणि बिन्यामीन येथील दोन लाख ऐंशी हजार योद्ध्यांचे सैन्य, लहान ढाली आणि धनुष्य घेऊन सुसज्ज होते. हे सर्व शूर लढवय्ये पुरुष होते.

  17. अमस्याहने यहूदीयाच्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सर्व यहूदाह आणि बिन्यामीनसाठी त्यांच्या कुटुंबांप्रमाणे हजारोंचे सेनापती आणि शंभराचे सेनापती नियुक्त केले. त्यानंतर त्याने वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकत्र केले आणि त्याला असे दिसून आले की लष्कराच्या सेवेसाठी योग्य असे तीन लाख पुरुष आहेत, भाला आणि ढाल हाताळण्यास ते सक्षम आहेत.

  18. उज्जीयाहने त्यांना ढाली, भाले, शिरस्त्राण, चिलखते, धनुष्ये आणि गोफणी यांचा पुरवठा केला.

  19. नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.

  20. याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता; तुमची कृपा एखाद्या ढालीप्रमाणे त्यांना वेढलेली असते.

  21. माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे, तुमचा उजवा हात मला आधार देतो; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.

  22. आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत; केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत.

  23. जगातील लोकांचे अधिपती, अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत; पृथ्वीवरील राजे वास्तविक परमेश्वराचेच आहेत, ते अत्यंत थोर आहेत.

  24. ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.

  25. हे समस्त इस्राएला, याहवेहवर भरवसा ठेव— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.