Shields बद्दल बायबलमधील वचने: Many of the Israelites used, with expertness
Many of the Israelites used, with expertness बद्दल वचने
गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.
यहूदाह गोत्रातील ढाल व भाला धारण करणारे हत्यारबंद 6,800 योद्धे;
नफतालीचे 1,000 अधिकारी आणि भाले व ढाली यांनी सुसज्ज असे 37,000 सैनिक;
आसाकडे यहूदीयाचे तीन लाख योद्ध्यांचे सैन्य, मोठ्या ढाली आणि भाले घेऊन सुसज्ज होते आणि बिन्यामीन येथील दोन लाख ऐंशी हजार योद्ध्यांचे सैन्य, लहान ढाली आणि धनुष्य घेऊन सुसज्ज होते. हे सर्व शूर लढवय्ये पुरुष होते.
अमस्याहने यहूदीयाच्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सर्व यहूदाह आणि बिन्यामीनसाठी त्यांच्या कुटुंबांप्रमाणे हजारोंचे सेनापती आणि शंभराचे सेनापती नियुक्त केले. त्यानंतर त्याने वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकत्र केले आणि त्याला असे दिसून आले की लष्कराच्या सेवेसाठी योग्य असे तीन लाख पुरुष आहेत, भाला आणि ढाल हाताळण्यास ते सक्षम आहेत.