मुख्य मजकुरावर जा

Sennacherib बद्दल बायबलमधील वचने

51 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हिज्कीयाहने इतके सर्व विश्वासूपणाने केल्यानंतर, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयावर आक्रमण केले. त्याने तटबंदीच्या शहरांना वेढा घातला या विचाराने की, ती स्वतःसाठी जिंकून घ्यावी.

  2. जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे,

  3. तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्‍यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली.

  4. त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?”

  5. नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.

  6. त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले:

  7. “बलवान आणि धैर्यशील असा. अश्शूरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले मोठे सैन्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका, कारण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपल्यासह आहे.

  8. त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.

  9. नंतर, जेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याच्या सर्व सैन्याने लाखीशला वेढा घातला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा हिज्कीयाह राजा आणि यहूदीयाच्या सर्व लोकांसाठी हा संदेश त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर देऊन त्यांना यरुशलेमकडे पाठवले:

  10. “अश्शूरचा राजा सन्हेरीब असे म्हणतो: तुम्ही कशावर भरवसा टेकवून तुम्ही या वेढ्यात यरुशलेममध्ये राहिला आहात?

  11. जेव्हा हिज्कीयाह म्हणतो, ‘याहवेह आमचे परमेश्वर हे आम्हाला अश्शूरच्या राजाच्या हातातून वाचवतील,’ तर तुम्ही भुकेले आणि तहानलेले असे होऊन मरावे म्हणून तो तुमची दिशाभूल करत आहे.

  12. हिज्कीयाहने स्वतःच या दैवताची उच्च स्थाने आणि वेद्या काढून टाकून यहूदीया आणि यरुशलेमला सांगितले नाही का की, ‘तुम्ही एकाच वेदीसमोर आराधना करावी आणि तिच्यावर होमार्पणे करावी?’

  13. “तुम्हाला हे माहीत नाही का, की मी आणि माझ्या आधीच्या लोकांनी इतर देशातील सर्व लोकांचे काय केले? त्या राष्ट्रांच्या दैवतांनी कधीतरी माझ्या हातातून त्यांच्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?

  14. माझ्या आधी या जागेवर काम करणाऱ्यांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला त्यांच्या सर्व दैवतांपैकी कोणीतरी त्याच्या लोकांना माझ्यापासून वाचवू शकले का? तर मग तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे बरे सोडवेल?

  15. तर आता हिज्कीयाहने तुमची फसवणूक करू नये आणि तुमची अशाप्रकारे दिशाभूल करू नये. त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण कोणत्याही राष्ट्राचे किंवा राज्याचे कोणतेही दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून किंवा माझ्या पूर्वीच्या लोकांच्या हातातून सोडवू शकले नाही. तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे सोडवेल!”

  16. सन्हेरीबचे अधिकारी परमेश्वर याहवेहविरुद्ध आणि त्यांचा सेवक हिज्कीयाहविरुद्ध पुढे बोलले.

  17. राजाने इस्राएलचे परमेश्वर याहवेहची थट्टा करणारी पत्रेही लिहिली आणि त्यांच्याविरुद्ध असे म्हटले: “जशी इतर देशातील लोकांच्या दैवतांनी त्यांच्या लोकांची माझ्या हातून सुटका केली नाही, त्याचप्रमाणे हिज्कीयाहचे दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून सोडविणार नाही.”

  18. तेव्हा ते शहर जिंकण्यासाठी त्यांनी तटबंदीवर असलेल्या यरुशलेमच्या लोकांना घाबरवून सोडण्यासाठी आणि त्यांना भीती वाटावी यासाठी यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडले.

  19. यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते.

  20. राजा हिज्कीयाह आणि आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा यांनी याबद्दल रडून स्वर्गाकडे प्रार्थना केली.

  21. आणि याहवेह यांनी एक देवदूत पाठवला, त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व लढवय्ये, सेनापती आणि अधिकारी यांचा नाश केला. त्यामुळे तो अपमानित होऊन स्वतःच्या भूमीकडे मागे फिरला. आणि जेव्हा तो त्याच्या दैवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्या काही मुलांनी, जे त्याचे स्वतःचे रक्त आणि मांस होते, त्यांनी त्याला तलवारीने कापले.

  22. अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला.

  23. पुष्कळ जणांनी यरुशलेमकडे याहवेहसाठी अर्पणे आणली आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह याच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या. तेव्हापासून तो सर्व राष्ट्रांद्वारे अत्यंत आदरणीय मानला गेला.

  24. त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तो त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती.

  25. म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला.