Skip to content

Self-Control बद्दल बायबलमधील वचने: Of David

35 वचने · 3 पैलू

Of David बद्दल वचने

  1. पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आल्यानंतर शौलाला सांगण्यात आले, “दावीद एन-गेदीच्या वाळवंटात आहे.”

  2. तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्‍यांच्या खडकाळ भागात गेले.

  3. रस्त्याने फिरत तो मेंढवाड्याच्या जवळ आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशेस गेला, दावीद आणि त्याची माणसेही त्या गुहेत अगदी लांब आतील बाजूस होती.

  4. दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला.

  5. त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले.

  6. तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.”

  7. या शब्दांनी दावीदाने त्याच्या माणसांचा कडकपणे निषेध केला आणि शौलावर हल्ला करण्यास आवरले. तेव्हा शौल गुहेतून बाहेर निघून आपल्या मार्गाने गेला.

  8. नंतर दावीद गुहेच्या बाहेर आला आणि शौलाला हाक मारली, “महाराज, माझ्या धन्या!” जेव्हा शौलाने मागे पाहिले, तेव्हा दावीदाने भूमीकडे आपले तोंड करून दंडवत घातले.

  9. तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’?

  10. आज तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, कशाप्रकारे याहवेहने गुहेमध्ये तुम्हाला माझ्या हाती दिले होते. तुम्हाला मारून टाकावे असे काहीजण म्हणाले, परंतु मी तुम्हाला सोडले; मी म्हणालो, ‘मी माझ्या धन्यावर हात टाकणार नाही, कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.’

  11. पाहा, माझ्या पित्या, तुमच्या झग्याचा तुकडा माझ्या हातात आहे तो पाहा! मी तुमच्या झग्याचा काठ कापून घेतला परंतु तुम्हाला मारून टाकले नाही. यावरून माझ्याकडे दुष्ट किंवा फितुरी असल्याचा दोष नाही. मी तुमच्याशी चुकीचे वागलो नाही, तरीही तुम्ही माझ्या जिवाची शिकार करण्यास टपला आहात.

  12. याहवेह तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करो. तुम्ही माझ्याबरोबर जे चुकीचे केले आहे त्याचा बदला याहवेहच घेवो, परंतु मी तुम्हाला हात लावणार नाही.

  13. जशी प्राचीन काळाची म्हण ‘दुष्टापासून दुष्टाई येते,’ म्हणून माझा हात तुम्हाला स्पर्श करणार नाही.

  14. “इस्राएलचा राजा कोणाविरुद्ध बाहेर आला आहे? तुम्ही कोणाचा पाठलाग करीत आहात? एका मेलेल्या कुत्र्याचा? एखाद्या पिसवाचा?

  15. याहवेहनेच आपला न्यायाधीश होऊन आपल्यामध्ये निवाडा करावा. त्यांनी माझा वाद लक्षात घेऊन माझा कैवार घ्यावा; व मला तुमच्या हातून सोडवून माझी सुटका करावी.”

  16. जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “जेशीमोनच्या समोर असलेल्या हकीलाहच्या डोंगरावर दावीद लपून राहत नाही काय?”

  17. तेव्हा शौल त्याच्या निवडलेल्या तीन हजार इस्राएली सैनिकांना बरोबर घेऊन दावीदाचा शोध घेण्यासाठी जीफच्या वाळवंटाकडे निघाला.

  18. शौलाने जेशीमोन समोर हकीलाहच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला छावणी घातली आणि दावीद रानातच राहिला. परंतु शौल आपल्यामागे आला आहे हे समजून,

  19. दावीदाने आपले दोन सैनिक पाठवून शौल खरोखरच तिथे आला काय याची माहिती काढून घेतली.

  20. नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता.

  21. तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?” अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.”

  22. तेव्हा दावीद आणि अबीशाई रात्रीच्या वेळेस सैन्याकडे गेले आणि शौल तिथे छावणीच्या आतमध्ये झोपलेला होता, त्याच्या उशाशी त्याचा भाला जमिनीमध्ये रोवलेला होता. अबनेर आणि सैनिक त्याच्याभोवती झोपलेले होते.

  23. अबीशाई दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझ्या शत्रूला आज तुझ्या हाती दिले आहे. तर आता मला भाल्याने त्याच्यावर एकच वार करून त्याला जमिनीत खुपसून टाकू द्या; दुसर्‍यांदा वार करावा लागणार नाही.”

  24. परंतु दावीद अबीशाईला म्हणाला, “त्याचा वध करू नको! याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकून कोण निर्दोष राहू शकेल?”

  25. दावीद म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह स्वतः त्याला मारतील, किंवा त्याची वेळ येईल आणि त्याचा मृत्यू होईल, किंवा तो युद्धात जाईल आणि त्याचा नाश होईल.