Skip to content

Salutations बद्दल बायबलमधील वचने

69 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अब्राहामाने आपली नजर वर करून पाहिले की तीन पुरुष जवळपास उभे आहेत, तो घाईने आपल्या तंबूच्या दाराकडून त्यांना भेटण्यास गेला व त्यांना भूमीपर्यंत लवून नमन केले.

  2. त्याच संध्याकाळी ते दोन दूत सदोमास पोहोचले. लोट नगराच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि आपले डोके भूमीकडे लववून त्याने दंडवत घातले.

  3. लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.” ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.”

  4. हे ऐकून अब्राहामाने त्या हेथी लोकांसमोर लवून मुजरा केला आणि तो म्हणाला,

  5. राष्ट्रे तुझी सेवा करोत, आणि लोक तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो. तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत. जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत, आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.”

  6. तो स्वतः सर्वांच्या पुढे चालला आणि आपल्या भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने त्याला भूमीपर्यंत लवून सात वेळा मुजरा केला.

  7. एसाव हा याकोबास भेटण्यास धावत आला; त्याने त्याला आलिंगन दिले; त्याला कवेत घेऊन त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले.

  8. त्याने आपले स्वप्न आपल्या भावांबरोबर आपल्या वडिलांनाही सांगितले, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला धमकावून विचारले, “हे काय बोलतोस? मी, तुझी आई आणि तुझे भाऊ तुझ्याकडे येऊन तुला भूमीपर्यंत लवून नमन करणार आहोत काय?”

  9. फारोहने योसेफाला आपल्या खालोखालच्या पदाचा रथही दिला आणि योसेफ जिकडे जाई तिकडे ललकारी उठे, “गुडघे टेका.” अशाप्रकारे फारोहने योसेफाला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले.

  10. योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या.

  11. “होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला.

  12. त्याने आपली नजर वर करून आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ, बिन्यामीनाकडे पाहून त्याने विचारले, “हाच का तुमचा धाकटा भाऊ, याच्याचविषयी तुम्ही मला सांगत होता ना?” आणि तो म्हणाला, “माझ्या मुला, परमेश्वर तुजवर कृपा करो.”

  13. मग आनंदाने रडू येत असतानाच, त्याने बिन्यामीनाला मिठी मारली आणि बिन्यामीनही रडू लागला.

  14. मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांच्यासह रडला आणि नंतर त्याचे भाऊ त्याच्याशी बोलू लागले.

  15. मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला.

  16. “हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.

  17. म्हणून ते तिथे वळले आणि मीखाहकडील त्या तरुण लेवीच्या घरी जाऊन त्याला अभिवादन केले.

  18. “तुमचे कल्याण असो,” तो म्हातारा गृहस्थ म्हणाला. “तुम्हाला जे काही लागेल ते मला पुरवू द्या. फक्त रात्र चौकात घालवू नका.”

  19. त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्‍यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!”

  20. “नंतर तिथून पुढे जात तू ताबोराच्या मोठ्या एलावृक्षाजवळ पोहोचशील. तिथे तुला बेथेलकडे परमेश्वराची आराधना करण्यासाठी निघालेली तीन माणसे भेटतील. एकजण तीन लहान करडे, दुसरा तीन भाकरी आणि तिसरा द्राक्षारसाची एक बुधली घेऊन जात असेल.

  21. ते तुला अभिवादन करतील आणि तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्याकडून स्वीकारशील.

  22. जेव्हा शमुवेलने शौलाला गाठले, शौल म्हणाला, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो! मी याहवेहच्या सूचना पार पाडल्या आहेत.”

  23. दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्‍याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले.

  24. तेव्हा दावीदाने दहा तरुण पुरुष पाठवित म्हटले, “कर्मेल येथे नाबालकडे जा आणि माझ्या नावाने त्याला अभिवादन करा.

  25. त्याला म्हणा, ‘चिरकाळ जग! तुला, तुझ्या घराण्याला व सर्व जे तुझे आहे त्यांना चांगली स्वस्थता लाभो!