Skip to content

Salutations बद्दल बायबलमधील वचने

69 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.

  2. ज्या क्षणाला तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानाने ऐकला, त्याच क्षणाला बाळाने माझ्या गर्भात आनंदाने उडी मारली.

  3. आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले.

  4. तू मला चुंबन दिले नाहीस. परंतु मी आत आलो तेव्हापासून हिने माझ्या पायांचे चुंबन घेणे थांबविले नाही.

  5. इतक्यात याईर नावाचा एक सभागृहाचा पुढारी आला, त्याने येशूंच्या पाया पडून त्यांनी आपल्या घरी यावे अशी आग्रहपूर्वक विनंती केली.

  6. “ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, प्रथम, ‘या घरास शांती लाभो’ असे म्हणा.

  7. कारण मी तुम्हाला सांगतो अनेक संदेष्ट्यांनी आणि राजे यांनी तुम्ही जे पाहिले आणि ऐकले, ते पाहण्याची आणि ऐकण्याची उत्कंठा धरली होती, परंतु ती पूर्ण झाली नाही.”

  8. तेव्हा तो उठला आपल्या पित्याकडे निघाला. “तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.

  9. माझा सहकारी तीमथ्य, तसेच माझे नातेवाईक लूक्य, यासोन आणि सोसिपतेर, हे तुम्हाला आपल्या सदिच्छा कळवीत आहेत.

  10. हे पत्र लिहिणारा, मी तर्तिय, प्रभूमध्ये तुम्हाला सदिच्छा देत आहे.

  11. गायस, जो माझे आणि इथे त्याच्या घरी जमणाऱ्या मंडळीचे आदरातिथ्य करतो, तो तुम्हाला त्याच्या सदिच्छा कळवितो. या शहराचा खजिनदार एरास्त, तसेच आपला विश्वासू बंधू क्किर्त यांच्याही तुम्हाला सदिच्छा.

  12. आता या पत्रातील शुभेच्छा मी पौल, स्वतःच्या हातांनी लिहित आहे.

  13. या ठिकाणी असणारे परमेश्वराचे सर्व लोक तुम्हाला शुभेच्छा पाठवित आहेत.

  14. तेथील सर्व पवित्र लोकांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी विचारणा सांगा. माझ्याबरोबर असलेले बंधू व भगिनी देखील तुम्हाला आपल्या शुभेच्छा पाठवितात.

  15. मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो.

  16. आता मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे, माझ्या सर्व पत्रात हे चिन्ह आहे आणि मी अशाप्रकारे लिहित असतो.

  17. जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका.

  18. जिला परमेश्वराने निवडले आहे, त्या तुझ्या बहिणीची मुले त्यांच्या शुभेच्छा पाठवितात.

  19. तुमची भेट लवकरच होईल, अशी मला आशा आहे आणि तेव्हा आपण समोरासमोर बोलू.