मुख्य मजकुरावर जा

Salutations बद्दल बायबलमधील वचने: By bowing

17 वचने · 37 पैलू

"Salutations" साठी शोधा

By bowing बद्दल वचने

  1. अब्राहामाने आपली नजर वर करून पाहिले की तीन पुरुष जवळपास उभे आहेत, तो घाईने आपल्या तंबूच्या दाराकडून त्यांना भेटण्यास गेला व त्यांना भूमीपर्यंत लवून नमन केले.

  2. त्याच संध्याकाळी ते दोन दूत सदोमास पोहोचले. लोट नगराच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि आपले डोके भूमीकडे लववून त्याने दंडवत घातले.

  3. लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.” ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.”

  4. हे ऐकून अब्राहामाने त्या हेथी लोकांसमोर लवून मुजरा केला आणि तो म्हणाला,

  5. राष्ट्रे तुझी सेवा करोत, आणि लोक तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो. तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत. जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत, आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.”

  6. तो स्वतः सर्वांच्या पुढे चालला आणि आपल्या भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने त्याला भूमीपर्यंत लवून सात वेळा मुजरा केला.

  7. त्याने आपले स्वप्न आपल्या भावांबरोबर आपल्या वडिलांनाही सांगितले, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला धमकावून विचारले, “हे काय बोलतोस? मी, तुझी आई आणि तुझे भाऊ तुझ्याकडे येऊन तुला भूमीपर्यंत लवून नमन करणार आहोत काय?”

  8. फारोहने योसेफाला आपल्या खालोखालच्या पदाचा रथही दिला आणि योसेफ जिकडे जाई तिकडे ललकारी उठे, “गुडघे टेका.” अशाप्रकारे फारोहने योसेफाला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले.

  9. योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या.

  10. “होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला.

  11. “हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.

  12. जेव्हा अबीगईलने दावीदाला पाहिले, तेव्हा ती घाईने गाढवावरून उतरली आणि तिने दावीदासमोर तोंड जमिनीकडे करून अभिवादन केले.

  13. तेव्हा अहीमाजने राजाला आवाज देत म्हटले, “सर्वकाही ठीक आहे!” त्याने आपले मुख जमिनीपर्यंत खाली लववून म्हटले, “याहवेह, आपला परमेश्वर धन्यवादित असो! माझ्या धनीराजाविरुद्ध हात उचलणार्‍यांना याहवेहने आपल्या हाती घेतले आहे.”

  14. बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले. राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?”

  15. आता पुन्हा एकदा एस्तेर राजाच्या पायांवर पडून व अश्रू ढाळून तिने राजाजवळ विनवणी केली. यहूद्यांच्या विरुद्ध अगागी हामानाने केलेली दुष्ट योजना स्थगित करावी, अशी तिची मागणी होती.

  16. ज्या घरात बालक व त्याची आई मरीया होती, तिथे ते गेले आणि त्यांनी दंडवत घालून त्याला नमन केले. नंतर त्यांनी आपले नजराणे उघडले आणि बालकाला सोने, ऊद व गंधरस हे अर्पण केले.

  17. त्यावेळी याईर नावाचा सभागृहाचा एक पुढारी आला, येशूंना पाहून त्यांच्या पाया पडला.