मुख्य मजकुरावर जा

Sacrifices बद्दल बायबलमधील वचने

248 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुसर्‍या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्‍हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली.

  2. राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचे आणि गुरांचे बळी देत होते की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.

  3. शलोमोनाने जेव्हा प्रार्थना करण्याचे संपविले, तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्याने होमार्पणे आणि बलिदाने भस्मसात करून टाकली आणि याहवेहच्या गौरवाने मंदिर भरून गेले.

  4. शलोमोन राजाने बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे अर्पण केली. याप्रकारे राजाने व सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली.

  5. रात्रीच्या वेळेस याहवेहने शलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी स्वतःकरिता हे ठिकाण यज्ञांसाठी मंदिर म्हणून निवडले आहे.

  6. राजाने सकाळ आणि संध्याकाळच्या होमार्पणासाठी आणि शब्बाथ, नवचंद्र आणि याहवेहच्या नियमात लिहिल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या सणांसाठी स्वतःच्या मालमत्तेतून दान दिले.

  7. कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हस्तकृतींनी माझा राग पेटविला गेला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’

  8. या भोजनसमारंभाचा कालावधी आटोपल्यावर इय्योब त्यांच्या शुद्धीकरणाची व्यवस्था करी. तो पहाटेस उठून त्या सर्वांकरिता होमार्पणाचा यज्ञ करी; कारण तो विचार करीत असे, “न जाणो माझ्या लेकरांनी पाप केले असेल आणि आपल्या अंतःकरणात परमेश्वराला शाप दिला असेल.” असा इय्योबाचा नित्यक्रम असे.

  9. त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा. आणि याहवेहवर विश्वास ठेवा.

  10. माझ्या सभोवती असणार्‍या शत्रूंसमोर माझे मस्तक उंच करतील. मी त्यांच्या पवित्र मंडपात हर्षगर्जना करून यज्ञ अर्पण करेन; मी गायन व संगीताने माझ्या याहवेहची स्तुती करेन.

  11. यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही— परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत; होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही.

  12. “त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार स्थापित केला.”

  13. भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे, हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय तुम्ही धिक्कारणार नाही.

  14. मग तुम्ही नीतिमान लोकांचे यज्ञ आणि सर्व होमार्पणाच्या यज्ञाने प्रसन्न व्हाल. तेव्हा ते तुमच्या वेदीवर बैल अर्पित करतील.

  15. म्हणूनच पुष्ट पशूंची तसेच मेंढ्याची होमार्पणे तुमच्याकडे आणेन; मी गोर्‍हे आणि बोकडांचे अर्पण करेन. सेला

  16. त्यांनी आपल्या लहान मुलामुलींनाही त्या खोट्या दैवतांना अर्पण केले.

  17. ते त्याला उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पोत, आणि हर्षगीते गाऊन त्यांच्या कृत्यांचे वर्णन करोत.

  18. मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.

  19. याहवेहच परमेश्वर आहेत; त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे. डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी मिरवणुकीत सामील व्हा.

  20. तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो; माझे हात उभारणे सायंकाळच्या यज्ञाप्रमाणे होवो.

  21. अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.

  22. “तुमची असंख्य होमर्पणे— ती माझ्यासाठी काय आहेत?” असे याहवेह म्हणतात. “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये मला काही आनंद नाही.

  23. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

  24. होमार्पणासाठी तुम्ही कोकरे आणली नाहीत. अर्पणे करून तुम्ही माझा सन्मान केला नाही. मी तुम्हाला अन्नार्पणाचे ओझे दिले नाही धूप जाळण्याचा आग्रह करून थकविले नाही.

  25. तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही, किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही. उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले व तुमच्या अपराधांनी मला शिणविले.