मुख्य मजकुरावर जा

Sacrifices बद्दल बायबलमधील वचने: Unaccepted in, on account of sin

4 वचने · 55 पैलू

Unaccepted in, on account of sin बद्दल वचने

  1. “तुमची असंख्य होमर्पणे— ती माझ्यासाठी काय आहेत?” असे याहवेह म्हणतात. “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये मला काही आनंद नाही.

  2. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

  3. परंतु जो वेदीवर बैल अर्पण करतो, त्याने ते अर्पण नरबली देण्यासारखेच असते, जो कोणी वेदीवर कोकर्‍याचे होमार्पण करतो तो अशा व्यक्तीसारखा आहे, जो कुत्र्याची मान मोडतो; जो कोणी अन्नार्पण करतो, तो डुकराचे रक्त अर्पण करणाऱ्यासारखा आहे, आणि जो कोणी स्मरणार्थ धूप जाळतो तो एखाद्या मूर्तिपूजकासारखा आहे. त्यांनी आपले मार्ग निवडले आहेत, ते त्यांच्या घृणास्पद गोष्टी करण्यामध्ये धन्यता मानतात;

  4. जरी ते त्यांचे यज्ञार्पण मला भेटस्वरूप अर्पितात, आणि तरीही ते मांस खातात, याहवेह त्यांच्याशी प्रसन्न नाही. आता ते त्यांचा दुष्टपणा स्मरणार आणि त्यांच्या पापांची शिक्षा देणार: ते इजिप्तला परततील.