Sacrifices बद्दल बायबलमधील वचने: Could not take away sin
Could not take away sin बद्दल वचने
यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही— परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत; होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही.
हे वर्तमान काळासाठी उदाहरण आहे, तिथे अर्पण केलेली दाने व अर्पणे उपासकाची विवेकबुद्धी शुद्ध करीत नाही.
नियमशास्त्र ज्या येणार्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया आहे—त्याचे खरे स्वरूप नाही. या कारणासाठी ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्या त्याच यज्ञांनी उपासनेसाठी येणार्यांना परिपूर्ण करण्यास केव्हाही समर्थ ठरत नाही.
तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती.
पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली.
कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.
यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले, “यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही, परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले;
होमार्पण व पापार्पण यांनी तुम्हाला संतोष झाला नाही.
मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे, हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ ”
ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते.
नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली.
आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.
प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो.