मुख्य मजकुरावर जा

Priests बद्दल बायबलमधील वचने

407 वचने · 86 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय.

  2. तरी टक्कलावर तांबूस पांढरा डाग असेल तर तो त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग असण्याचा संभव आहे.

  3. याबाबतीत याजक त्याची तपासणी करेल आणि डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर अंगावरील त्वचेवर कुष्ठरोगासारखा दिसणारा तांबूस पांढरा चट्टा असेल,

  4. तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडलेला चट्टा कुष्ठरोगाचा आहे; ती व्यक्ती अशुद्ध आहे; याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे.

  5. असा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे.

  6. जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.

  7. एखाद्या लोकरीच्या वा तागमिश्रित सुताच्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला रोगाचा संसर्ग झाला आहे,

  8. सुताच्या, लोकरीच्या ताण्याने विणलेले वस्त्र वा तागमिश्रित चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोग झाला आहे, असा संशय आला

  9. आणि जर ते चामड्याच्या, विणलेल्या वस्त्रावर, अथवा चामड्याच्या वस्तूवर हिरवट किंवा तांबूस चट्टा असला, तर तो कुष्ठरोगच आहे, म्हणून तपासणीसाठी ती वस्तू याजकाकडे अवश्य घेऊन जावी.

  10. याजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.

  11. And he shall look on the plague on the seventh day: if the plague be spread in the garment, either in the warp, or in the woof, or in a skin, or in any work that is made of skin; the plague is a fretting leprosy; it is unclean.

  12. तेव्हा याजकाने ती वस्त्रे, ते कापड किंवा ती विणलेली लोकरीची वा चामड्याची वस्तू संसर्गजन्य आहे असे म्हणून अग्नीत जाळून टाकावी.

  13. पण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी.

  14. Then the priest shall command that they wash the thing wherein the plague is, and he shall shut it up seven days more:

  15. मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो पसरला नाही. तरी तो अशुद्ध आहे असे समजावे; ती वस्तू जाळून टाकावी कारण तिला आतून, बाहेरून, सगळीकडून कुष्ठरोगाचा संसर्ग पोहोचला आहे असे समजावे.

  16. पण धुतल्यानंतर चट्ट्याचा रंग फिकट झाला आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने चट्टा असलेल्या विणलेल्या कापडाच्या वा चामड्याच्या वस्तूचा तेवढाच भाग कापून टाकावा.

  17. इतके करूनही जर तो चट्टा या विणलेल्या वस्त्रावर किंवा चामड्याच्या वस्तूवर पुन्हा फुलून निघाला, तर याजकाने ती वस्तू अवश्य जाळून टाकावी, कारण तिला कुष्ठरोग आहे.

  18. पण ती विणलेल्या कापडाची किंवा चामड्याची वस्तू धुतल्यानंतर तिच्यावरील चट्टा नाहीसा झाला, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल.

  19. लोकरीच्या व तागमिश्रित सुताच्या विणलेल्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला, चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहे.

  20. “जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन,

  21. तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’

  22. याजकाने घरामध्ये जाऊन चिन्हाचे परीक्षण करण्यापूर्वी, त्याने घर रिकामे करण्याचा आदेश दिला पाहिजे, अन्यथा त्या घरातील सर्व वस्तू अशुद्ध होऊ शकतील. त्यानंतर याजकाने त्या घरात प्रवेश करून त्याची तपासणी करावी.

  23. त्याने घराच्या भिंतींची तपासणी करून त्यावरील चट्टा भिंतींपेक्षा खोलवर हिरवट किंवा लालसर आहे, असे याजकाला आढळले,

  24. तर याजकाने घराबाहेर दाराजवळ यावे आणि ते घर सात दिवस बंद ठेवावे.

  25. मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा भिंतीवर पसरला असेल,