Skip to content

Priests बद्दल बायबलमधील वचने

407 वचने · 86 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर याजकाने चट्टा असलेला भाग काढून तो नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी.

  2. नंतर भिंतीचा आतील भाग पूर्णपणे खरवडून त्याची दगड व माती नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी.

  3. मग त्या जागी बसविण्यासाठी दुसरे दगड आणावेत व नव्या चुन्याचा गिलावा करावा.”

  4. दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला,

  5. तर याजकाने आत येऊन तो तपासावा, आणि जर चट्टा पसरला आहे असे त्याला दिसून आले, तर तो न निघणारा कुष्ठरोग असून ते घर अशुद्ध झाले आहे.

  6. मग ते घर पाडून टाकण्यात यावे व त्या घराचे दगड, चुना, लाकूड नगराबाहेर नेऊन अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावे.

  7. याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण म्हणून याहवेहपुढे अर्पून तिच्या स्त्रावाच्या अशुद्धतेकरिता प्रायश्चित्त करावे.

  8. “अशाप्रकारे इस्राएली लोकांना तू अशुद्धतेपासून दूर ठेवावे. आपल्यावर मरणाचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या अशुद्धतेमुळे त्यांच्यामध्ये ज्या निवासमंडपात मी राहतो तो अशुद्ध करू नये.”

  9. त्याने तागाचा पवित्र झगा घातला पाहिजे आणि त्याच्या शरीराभोवती तागाचे अंतर्वस्त्र घालावे; तागाच्या वस्त्राने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा. ही पवित्र वस्त्रे आहेत; म्हणून ती अंगावर घालण्यापूर्वी त्याने पाण्याने स्नान करावे.

  10. याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये,

  11. आपले जवळचे नातलग म्हणजे त्याची आई किंवा वडील, पुत्र किंवा कन्या, त्याचा भाऊ

  12. किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो.

  13. याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये.

  14. “ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत.

  15. त्यांनी त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र राहावे आणि त्यांच्या परमेश्वराच्या नावाला काळिमा लावू नये. ते याहवेहला अन्नार्पण म्हणजे त्यांच्या परमेश्वराचे अन्न अर्पितात, म्हणून त्यांनी पवित्र राहावे.

  16. “ ‘त्यांनी वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या किंवा त्यांच्या पतीला घटस्फोट दिलेल्या स्त्रियांबरोबर विवाह करू नये; कारण याजक त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र आहेत.

  17. “अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये.

  18. एखादा मनुष्य आंधळा, लंगडा, चपट्या नाकाचा, हातापायांना अधिक बोटे असलेला;

  19. ज्याचा पाय किंवा हात तुटलेला आहे,

  20. कुबडा, ठेंगणा, डोळ्यात कमतरता असलेला, त्वचेचे रोग असलेला व भग्नांड असून

  21. तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये.

  22. तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो;

  23. पण त्याला शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने पडद्यामागील परमपवित्रस्थानात किंवा वेदीजवळही जाऊ नये, त्याने तसे केल्यास, माझे पवित्रस्थान भ्रष्ट होईल, कारण त्यांना पवित्र करणारा मीच याहवेह आहे.’ ”

  24. याहवेह मोशेला म्हणाले,

  25. “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग की, इस्राएलच्या लोकांनी आणलेल्या पवित्र अर्पणांचा आदर करावा, म्हणजे ते माझ्या पवित्र नावाला अपवित्र करणार नाही. मी याहवेह आहे.