Skip to content

Oaths बद्दल बायबलमधील वचने

94 वचने · 41 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते.

  2. परंतु सर्व पुढार्‍यांनी उत्तर दिले, “आपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराद्वारे त्यांना शपथ दिली आहे आणि आता आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही.

  3. आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.”

  4. तुमच्यामध्ये जी उर्वरित राष्ट्रे आहेत त्यांच्याशी संगती करू नका; त्यांच्या दैवतांची नावे घेऊ नका किंवा त्यांची शपथही घेऊ नका. तुम्ही त्यांची सेवा करू नये किंवा त्यांना नमन करू नये

  5. गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.”

  6. इफ्ताहाने याहवेहला नवस केला: “जर तुम्ही अम्मोनी लोकांना माझ्या हाती द्याल,

  7. आणि जेव्हा मी अम्मोन्यांकडून सुरक्षित परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जे काही मला भेटायला येईल ते याहवेहचे असेल आणि मी त्याचा होमार्पण म्हणून यज्ञ करेन.”

  8. नंतर इफ्ताहाने अम्मोन्यांवर आक्रमण केले आणि याहवेहने त्यांना त्याच्या हाती दिले.

  9. अरोएरापासून ते मिन्नीथापर्यंतच्या वाटेवरील सर्व वीस नगरांमध्ये आणि दूर आबेल-करामीमपर्यंत त्याने अम्मोन्यांची भयंकर कत्तल केली. अशाप्रकारे इस्राएली लोकांनी अम्मोनी लोकांस जेरीस आणले.

  10. जेव्हा इफ्ताह मिस्पाह येथे आपल्या घरी परतला, त्याची कन्या डफ वाजवित व आनंदाने नृत्य करीत त्याला भेटण्यास बाहेर आली! ती त्याची एकुलती एक कन्या होती, तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.

  11. जेव्हा त्यांना तिला पाहिले, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो आकांत केला, “हाय, हाय, माझ्या कन्ये! तू मला मातीत मिळविले आहेस आणि तू माझ्या शोकाचे कारण झाली आहेस! कारण मी याहवेहला नवस केला आहे, जो आता मला मागे घेता येत नाही.”

  12. “माझ्या पित्या,” तिने म्हटले, “याहवेहला तुम्ही आपले वचन दिलेले आहे. तुम्ही दिलेल्या वचनानुसार माझ्यासोबत करा, कारण याहवेहने तुमचे शत्रू अम्मोनी लोकांवर तुम्हाला विजय दिलेला आहे.

  13. आता जे उरले आहेत त्यांच्यासाठी पत्नी मिळवून देण्यास काय करावे? कारण आपण तर याहवेहची शपथ घेऊन म्हटले आहे की विवाहात त्यांना आपण आपल्या कन्या देणार नाही.”

  14. तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो.”

  15. आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”

  16. आणि हन्ना त्याला म्हणाली, “माझ्या स्वामी, मला क्षमा करा. तुमच्या जीविताची शपथ, मी तीच स्त्री आहे जी येथे तुमच्या बाजूला उभी राहून याहवेहकडे प्रार्थना करीत होती.

  17. “याहवेह तुला काय म्हणाले?” एलीने विचारले. “माझ्यापासून ते लपवू नकोस. ज्यागोष्टी त्यांनी तुला सांगितल्या त्या जर तू माझ्यापासून लपवून ठेवल्या तर परमेश्वर तुला फार कठीण शिक्षा देवो.”

  18. परंतु आपल्या पित्याने लोकांना शपथबद्ध केले आहे याविषयी योनाथानला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या हातात असलेल्या काठीचे टोक मधाच्या पोळ्यात घातले व ते खाल्ले आणि त्याचे डोळे टवटवीत झाले.

  19. शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.”

  20. तेव्हा योनाथानने दावीदाच्या घराण्याबरोबर एक करार केला, तो म्हणाला, “आता याहवेह दावीदाच्या शत्रूंची झडती घेवो.”

  21. आणि योनाथानने दावीदाकडून त्याच्या आपल्या प्रीतिकरिता त्याच्या शपथेची पुष्टी केली, कारण आपल्या जिवासारखीच त्याने त्याच्यावर प्रीती केली.

  22. तर आता, माझ्या धन्या, याहवेह तुमच्या जिवंत परमेश्वराची व तुमची शपथ, याहवेहने तुम्हाला रक्तपातापासून आणि तुमच्या हातांना सूड घेण्यापासून आवरले आहे, तुमचे सर्व शत्रू आणि जे माझ्या धन्याला इजा आणू पाहतात ते नाबालाप्रमाणे होवो.

  23. तर आता बाहेर जा आणि तुमच्या माणसांना उत्तेजित करा. मी जिवंत याहवेहची शपथ घेऊन सांगतो की, तुम्ही बाहेर गेला नाही, तर आज रात्र येईपर्यंत तुमच्याजवळ एकही मनुष्य असणार नाही. तुमच्या तारुण्यापासून आजपर्यंत जी सर्व अरिष्टे तुमच्यावर आली त्यापेक्षा हे तुमच्यासाठी अधिक वाईट असे होईल.”

  24. शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली.

  25. तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले आणि त्याला म्हटले, “याहवेहसमोर तुझ्याकडून शपथ घेऊन तुला मी चेतावणी दिली नव्हती काय की, ‘तू यरुशलेम सोडून कुठेही जाशील त्या दिवशी खचितच तू मरशील’? त्यावेळी तू मला म्हणालास, ‘तुम्ही जे काही म्हणता ते बरे आहे, मी त्याप्रमाणे करेन.’