Oaths बद्दल बायबलमधील वचने: Condemned for false
Condemned for false बद्दल वचने
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘मी हा शाप पाठवेन, तो प्रत्येक चोराच्या घरात व माझ्या नावाने खोटी शपथ वाहणार्या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करेल. तो त्या घरावर राहील आणि त्याचे लाकूड व दगडासहित सर्वाचा संपूर्ण नाश करेल.’ ”
“त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.