Skip to content

Oaths बद्दल बायबलमधील वचने: Jephthah

7 वचने · 41 पैलू

Jephthah बद्दल वचने

  1. इफ्ताहाने याहवेहला नवस केला: “जर तुम्ही अम्मोनी लोकांना माझ्या हाती द्याल,

  2. आणि जेव्हा मी अम्मोन्यांकडून सुरक्षित परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जे काही मला भेटायला येईल ते याहवेहचे असेल आणि मी त्याचा होमार्पण म्हणून यज्ञ करेन.”

  3. नंतर इफ्ताहाने अम्मोन्यांवर आक्रमण केले आणि याहवेहने त्यांना त्याच्या हाती दिले.

  4. अरोएरापासून ते मिन्नीथापर्यंतच्या वाटेवरील सर्व वीस नगरांमध्ये आणि दूर आबेल-करामीमपर्यंत त्याने अम्मोन्यांची भयंकर कत्तल केली. अशाप्रकारे इस्राएली लोकांनी अम्मोनी लोकांस जेरीस आणले.

  5. जेव्हा इफ्ताह मिस्पाह येथे आपल्या घरी परतला, त्याची कन्या डफ वाजवित व आनंदाने नृत्य करीत त्याला भेटण्यास बाहेर आली! ती त्याची एकुलती एक कन्या होती, तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.

  6. जेव्हा त्यांना तिला पाहिले, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो आकांत केला, “हाय, हाय, माझ्या कन्ये! तू मला मातीत मिळविले आहेस आणि तू माझ्या शोकाचे कारण झाली आहेस! कारण मी याहवेहला नवस केला आहे, जो आता मला मागे घेता येत नाही.”

  7. “माझ्या पित्या,” तिने म्हटले, “याहवेहला तुम्ही आपले वचन दिलेले आहे. तुम्ही दिलेल्या वचनानुसार माझ्यासोबत करा, कारण याहवेहने तुमचे शत्रू अम्मोनी लोकांवर तुम्हाला विजय दिलेला आहे.